आंबेडकरांसोबत दगाबाजी करणाऱ्यांची हकालपट्टी करू - इम्तियाज जलील

आंबेडकरांसोबत दगाबाजी करणाऱ्यांची हकालपट्टी करू - इम्तियाज जलील

औरंगाबाद - औरंगाबादेत दलित बांधवांनी साथ दिल्यानेच इम्तियाज जलील खासदार झाले. मात्र, अकोला व सोलापूर या लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांनी साथ न दिल्याने दोन्ही ठिकाणी प्रकाश आंबेडकरांचा पराभव झाला. यावर जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान, याबाबत प्रश्‍न उपस्थित केला असता दगाबाजी करणाऱ्यांची एमआयएम हकालपट्टी करेल, असे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी येथे घोषित केले. 

गेल्या चाळीस वर्षानंतर इम्तियाज यांच्या रुपाने येथे मुस्लिम समाजाला खासदार मिळाला आहे. विजयी झाल्यानंतर सोमवारी (ता.27) इम्तियाज यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, शहरासह जिल्ह्याचा विकास करण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेवर लक्ष द्यावे लागणार आहे. दिल्ली येथे शपथविधी करून परतल्यानंतर जिल्ह्याचा दौरा करणार आहे. चांगले रस्ते, स्वच्छता आणि लोकांना पाणी मिळायला हवे, यासाठी काम करेल. आत्तापर्यंत चंद्रकांत खैरे यांनी सतत कुठल्या कामासाठी कोणते ठेकेदार असावेत, हेच काम केले, असा टोला त्यांनी लगावला.

हिंदुच्या सुरक्षेची आता माझी जबाबदारी- इम्तियाज जलील

दरम्यान, औरंगाबाद वगळता इतर ठिकाणी मुस्लिमानी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारास मते देण्याऐवजी इतरांना मदत केली, असा आरोप सुरु आहे, या प्रश्नावर त्यांनी याबाबत प्राथमिक माहिती आमच्याकडे आली आहे, नेमके काय झाले, हे पाहावे लागेल, असे उत्तर त्यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com