औरंगाबादेतील कचरा कोंडीला खासदार खैरेच जबाबदार! 

राजेभाऊ मोगल 
मंगळवार, 17 जुलै 2018

औरंगाबाद : गेल्या पाच महिन्यापासून शहरात कचऱ्याची कोंडी झाली असून सध्या कचऱ्यामुळे अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरल्याने साथीचे रोग होण्याची भिती वाटते आहे. हा प्रश्‍न सोडविण्यास अपयशी ठरलेले, महापालिकेच्या छोट्या - छोट्या गोष्टींमध्ये लुडबुड करणारे खासदार चंद्रकांत खैरे हे कचऱ्याचे राजकारण करीत असून कचरा प्रश्‍नाला तेच स्वत: जबाबदार असल्याची टिका मंगळवारी (ता.17) भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी केला आहे. 

सध्या पावसामुळे शहराच्या विविध भागातील कचऱ्याची दुर्गंधी पसरली आहे. पाच महिन्यांपासून प्रशासनही केवळ बैठका घेत एक-एक दिवस पुढे ढकलत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, या प्रश्‍नी खासदार खैरे यांनी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर आरोप केल्यामुळे दुखावलेल्या भाजपा नेत्यांनी मंगळवारी तातडीने पत्रकार परिषद घेत खासदार खैरेंवर टोलेबाजी केली. डॉ कराड म्हणाले, खरे तर श्री. बागडे यांनीच पुढाकार घेत नारेगाव येथील जनतेकडून चार महिन्यांचा अवधी मागीतला होता. मात्र, त्या चार महिन्याच्या कालावधीत खासदार खैरेंना हा प्रश्‍न सोडविता आला नाही. याप्रश्‍नी सर्वपक्षीयांची साधी एक विशेष बैठकही त्यांना का घ्यावी, असे वाटले नाही. 10 वर्ष आमदार, 20 वर्ष खासदार असतानाही शहरातील कचरा प्रश्‍न सोडविता आलेला नाही. त्यांच्या राजकारणामुळेच शहराची वाट लागली आहे. याचा उद्योग, व्यापार, शिक्षण, युवापिढीवर वाईट परिणाम होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

या प्रश्‍नांवर भाजपा नेत्यांचे तोंडावर बोट 
खासदार खैरे हे अपयशी ठरले म्हणता. मग महापालिकेच्या सत्तेतून भाजपा बाहेर का पडत नाही.? आगामी निवडणुकीत खैरे यांना मतदार करू नका, असे म्हणणार आहात का ? लोकसभा निवडणुकीसाठी खैरे यांच्या ऐवजी दुसरा चेहरा द्या, अशी मागणी तुम्ही शिवसेनेकडे करणार आहात का? असे पत्रकारांनी प्रश्‍न उपस्थित केले होते. मात्र, यापैकी एकाही प्रश्‍नांचे उत्तर न देता उपस्थित भाजपाचे प्रदेश प्रवक्‍ता शिरीष बोराळकर, उपमहापौर विजय औताडे यांनी गप्प बसणे पसंत केले. 

Web Title: mp khaire is responsible for garbage problem in aurangabad