भांडण दिराशी आणि "ते' नवरा सोडताहेत! : सुप्रिया सुळे

राजेभाऊ मोगल
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

हे पक्षांतर म्हणजे भांडण दिराशी आणि ते नवरा सोडताहेत, अशी अवस्था असल्याची तिरकस टिका खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे केली.

औरंगाबाद : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून मोठ्या प्रमाणात पक्षांतर सुरु आहे. हे पक्षांतर म्हणजे भांडण दिराशी आणि ते नवरा सोडताहेत, अशी अवस्था असल्याची तिरकस टिका खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे केली. शिवाय, हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत बोलण्यासाठी आपण दोन दिवस प्रयत्न केले, असेही त्यांनी नमुद केले.

खासदार सुळे या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. सायंकाळी त्यांची पैठणगेट येथे सभा होणार आहे. तत्पूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सोडून जात असलेल्याबद्दल तिरकस टिका केली. त्या म्हणाल्या, 2014 च्या निवडणुकीच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला अलीबाबा अन् चाळीस चोर म्हटले होते. आता त्याच चोरांना सोबत घेत फडणवीस त्यांचा सन्मान करीत आहेत. आणि आम्ही त्यांना चोर म्हणतही नाहीत, असे स्पष्ट करीत तसे त्यांनीच म्हटले होते. त्याचा आता त्यांनीच खुलासा करावा, असे आवाहनही यावेळी सुळे यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Supriya Sule criticize Harshawardhan Patil