एमपीएससीचे सर्व्हर डाऊन; विद्यार्थ्यांचे हॉल तिकिट अडकले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जून 2019

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उद्या (ता.16) महाराष्ट्र गट क सेवेची पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.

औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उद्या (ता.16) महाराष्ट्र गट क सेवेची पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. राज्यभरातून हजारो उमेदवारांनी या पदासाठी अर्ज केले असून यातील बहुतांश उमेदवारांना या परीक्षेला मुकावे लागणार आहे. कारण आज (शनिवार) एमपीएससीचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे अनेकांना हॉल तिकीट काढता आलेले नाही.

राज्य सरकारतर्फे एमपीएससीची तुरकळ प्रमाणातील जागांची जाहिरात केली जाते. राज्यात लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. वर्षानुवर्षे विद्यार्थी शिकवणी, सेल्फ स्टडीसह या स्पर्धा परीक्षेचा आभ्यास करतात. यातही अशा सर्व्हर डाऊनचे प्रकार सुरू झाल्यामूळे अनेकांना हॉल तिकिट काढता येत नाही. परिणामी हजारो विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहवे लागते.

आज (शनिवार) सायंकाळी पाच वाजेनंतर सर्व्हर डाऊन झाले. औरंगाबादसह इतर शहरातील परीक्षार्थीना हॉल तिकिट काढता आले नाही. औरंगाबाद जिल्ह्यात 27 उपकेंद्रावर 9 हजार 576 उमेदवार या परीक्षा देणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MPSC server down Students hall ticket got stuck