वीज कंपनीचे अभियंते कामगार संपावर

अनिलकुमार जमधड़े
सोमवार, 7 जानेवारी 2019

वीज कंपन्यातील खाजगीकरण सह विविध मागण्यांसाठी वीज कर्मचारी अभियंते संघटना संयुक्त कृती समितीतर्फे सोमवारी (ता. 7) लाक्षणिक संप करण्यात येत आहे. वीज कंपन्यांच्या प्रवेशद्वारासमोर आज कामगारांनी तीव्र निदर्शने केली. 

औरंगाबाद : वीज कंपन्यातील खाजगीकरण सह विविध मागण्यांसाठी वीज कर्मचारी अभियंते संघटना संयुक्त कृती समितीतर्फे सोमवारी (ता. 7) लाक्षणिक संप करण्यात येत आहे. वीज कंपन्यांच्या प्रवेशद्वारासमोर आज कामगारांनी तीव्र निदर्शने केली. 

 

महावितरणमध्ये खासगीकरणाचे वारे वाहत आहेत. महावितरणने मुंब्रा, शीळ, कळवा आणि मालेगाव विभागाची यंत्रणा फ्रॅंचायझीच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. म्हणूनच या खासगीकरणाच्या विरोधात तीनही वीज कंपनींतील 86,000 कामगार आणि अभियंते आज एक दिवसाचा लाक्षणिक संप करत आहेत.

यासाठी वीज कर्मचारी-अभियंते संघटनांच्या कृती समितीने वज्रमूठ आवळली आहे. वीज कंपनीच्या खासगीकरणाची प्रक्रिया थांबवावी, महावितरणने कर्मचाऱ्यांची पुनर्रचना करताना संघटनांनी सुचवलेल्या बाबी लक्षात घ्याव्यात, महानिर्मिती कंपनीचे 210 मे.वॅ. क्षमतेचे संच बंद करण्याचे धोरण रद्द करावे. तीनही कंपनींतील रिक्त पदे तातडीने भरावीत, पेन्शन योजना लागू करावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने कायम करावे, अशा विविध मागण्या करण्यात आलेल्या आहेत; मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष करून खासगीकरणावर भर दिला जात असल्याचा आरोप संघटनेचे नेते सय्यद जहिरोद्दीन यांनी केला. 

Web Title: MSEB employees is on strike