मोबाईल कंपनीचा महावितरणला साडेपाच लाखाचा चूना

मोबाईल कंपनीचा महावितरणला साडेपाच लाखाचा चूना

नांदेड : अर्धापूर तालुक्यातील मालेगाव परिसरात असलेल्या जीटीएल मोबाईल टॉवरच्या वीज मिटरमध्ये बिघाड करून चक्क साडेपाच लाखाचा महावितरण कंपनीला गंडा घातला. याप्रकरणी नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
जिल्ह्यात महावितरणच्या संपत्तीवर डल्ला मारणारी टोळी सक्रीय झाली असतांनाच ते डीपीमधील ऑईल व तांब्याची तार चोरून नेत असत. या प्रकरणांच्या अनेक घटना घडल्या आहेत. परंतु, यापुढे जाऊन आता चक्क जीटीएल इन्फ्रा या कंपनीने मालेगाव परिसरात लावलेल्या मोबाईल टॉवरला महावितरणचे वीज मीटर घेतले.

परंतु, या मिटरमध्ये खाडाखोड करून त्यांनी या टॉवरसाठी 34 हजार 400 युनीट चोरून घेतले. या युनीटचा चार्ज 4 लाख 96 हजार 680 रुपये होतो. ही बाब मालेगाव येथील सहाय्यक अभियंता सूर्यकांत सावरगावे यांच्या लक्षात आली. त्यांनी या प्रकरणात मोबाईल टॉवरला तडजोडअंती पुन्हा 72 हजाराचा वीज बिलापोटी दंड आकारला. असे साडेपाच लाख रुपयाचा मोबाईल कंपनीने महावितरणला गंडा घातला. या प्रकरणी नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात संबंधीत मोबाईल टॉवरविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास फौजदार पाटील करीत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com