महावितरणने थांबवली थकबाकी वसुली मोहीम 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

औरंगाबाद - महावितरण कंपनीने गेल्या काही दिवसांपासून शहरातील वीजबिल थकबाकी वसुली मोहीम थांबवली आहे. असे असले तरीही शहरालगत असलेल्या वसाहतीतील ग्राहकांकडून थकबाकी वसुली करण्याचे आदेश मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिले आहेत. 

भारतनगर येथील भाजी विक्रेता जगन्नाथ शेळके यांनी साडेआठ लाख रुपयांचे वीज बिल आल्याने, गळफास लावून आत्महत्या केली. शेळके यांच्या आत्महत्येमुळे महावितरणमध्ये खळबळ उडाली. या घटनेचे पडसाद वरिष्ठ कार्यालयापर्यंत पोचले. त्यामुळे शेळके यांच्या आत्महत्येनंतर शहरी भागातील वीज बिलाची थकबाकी वसुली मोहीम काही कालावधीसाठी थांबविण्यात आली; मात्र शहरालगत असलेल्या चिकलठाणा, सातारा, माळीवाडा आणि हर्सूल या परिसरातील महावितरणच्या ग्राहकांकडे असलेली थकबाकी वसूल करण्याचे आदेश नुकतेच देण्यात आले आहेत. त्यानुसार शहरालगत असलेल्या वसाहतींमध्ये थकबाकी वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहरातील वातावरण निवळल्यानंतर थकबाकी वसुलीची मोहीम पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे गणेशकर यांनी स्पष्ट केले. 

Web Title: MSEB stopped the outstanding recovery campaign