लातूर : 14 लाइनमनला महावितरण करणार बडतर्फ

MSEB's 14 Employees Tedrminate in Latur
MSEB's 14 Employees Tedrminate in Latur

लातूर - येथील महावितरणच्या सहायक अभियंत्याला माराहाण केल्याप्रकरणी बुधवारी (ता. चार) 14 लाइनमनना निलंबित करण्यात आले होते. आता या 14 जणांवर बडतर्फीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. यातून महावितरणने नोटिसा देण्यास सुरवात केली आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशी लाइनमन संघटनेने या सहायक अभियंत्याला निलंबित करावे, या
मागणीसाठी धरणे आंदोलन सुरूच ठेवले आहे. या आंदोलनात इतर जिल्ह्यांतील काही प्रतिनिधीही सहभागी झाले होते. 

महावितरणच्या येथील शहर शाखा क्रमांक पाचचे सहायक अभियंता गोविंद सर्जे यांनी लाइनमन प्रशांत बागडे यांना मारहाण केली होती. बागडे यांना पोलिस ठाण्यात नेऊन त्यांच्याच विरोधात तक्रारही दिली होती. या प्रकारानंतर लाइनमननी श्री. सर्जे यांना कार्यालयाच्या बाहेर काढून मारहाण केली होती. याप्रकरणी महावितरणचे कार्यकारी अभियंता मदन सांगळे यांनी
सर्जे यांना मारहाण करणारे प्रशांत बागडे, हरिदास कोळी, अविनाश गाढवे, विकास कातळे, सुनील फुंदे, महादेव सूर्यवंशी, रवी पांचाळ, रमेश मुंडे, अमोल डाके, विष्णू पाटील, अजित शिंदे, संतोष बैनवाड, रवींद्र घोडके, राम खरटमोल यांना निलंबित केल होते.

या घटनेची वरिष्ठ पातळीवरही दखल घेण्यात आली आहे. दरम्यान, आता या चौदा जणांवर बडतर्फीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. यातून त्यांना नोटिसा देण्यास सुरवात झाली आहे. दोन दिवसांत खुलासा सादर करावा, असे आदेश कार्यकारी अभियंता सांगळे यांनी दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणात श्री. सर्जे यांना निलंबित करावे, या मागणीसाठी इलेक्‍ट्रिसिटी लाइनस्टाफ संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 

वरिष्ठ पातळीवर दखल 
या घटनेबाबत महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेने सहव्यवस्थापकीय संचालक औरंगाबाद यांच्याकडे या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. गुरुवारी (ता. पाच) मुख्यालय, मुंबई येथे हे संचालक संचलन दिनेशचंद्र साबू यांची भेट घेऊन लातूर येथील प्रकरणाबाबत माहिती दिली व या गंभीर प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन यांनी केली.

यावेळी संचालकांनी तत्काळ मुख्य अभियंता, लातूर यांना या प्रकरणाची विचारणा केली. यासंदर्भात त्रिसदस्यीय चौकशी समिती गठित केली असून त्या समितीमध्ये अधीक्षक अभियंता (इन्फ्रा), उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी व लेखा अधिकारी यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. यावर संचालकांनी सहायक अभियंत्यास मारहाण होताना सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओ क्‍लिप व ज्या कामगारास सहायक अभियंता यांनी मारहाण केली त्याबाबत सखोल चौकशी करून त्याचा अहवाल 48
तासांमध्ये देण्यात यावा, असे आदेश दिले आहेत; तसेच अभियंता यांना मारहाण होत असताना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कामगारांनाही निलंबित केले आहे.

ज्याचे नावे एफआयआर'मध्ये नाहीत अशांवर ही कारवाई झाली आहे. त्यांचे निलंबन आदेश मागे घ्यावेत, असे आदेशही देण्यात आले आहेत, अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com