अळ्यांच्या आक्रमणांनी औरंगाबादमधील नागरिक हैराण (व्हिडिओ)

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 12 जुलै 2019

औरंगाबाद जिल्ह्यातील वजनापूर गावात सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे अळ्यांची.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील वजनापूर गावात सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे अळ्यांची. या गावात लाखो अळ्यांनी आक्रमण केले असून, अळ्या चालायला लागल्या की सापासारख्या दिसत आहेत. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

इतक्या मोठ्या प्रमाणात आळ्या गावात आल्या कुठून, त्यामुळे जनावरे, मानवाच्या जीवाला धोका तर नाही ना, कोणता रोग तर पसरणार नाही ना, यांसारख्या प्रश्नांमुळे गावकरी सध्या चिंतेत आहेत. या अळ्यांबाबतची माहिती मिळाल्यानंतर 'साम'च्या टीमने थेट गाव गाठले आणि यामागची खरी परिस्थिती मांडली. त्यानंतर कीटकशास्त्रज्ञांनी या अळ्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले आहे. याबाबत कीटकशास्त्रज्ञ एन. आर. पतंगे यांनी सांगितले, की सेंद्रिय भागात जास्त प्रमाण असल्याने या अळ्यांची निर्मिती होत आहे. यापासून धोका किंवा नुकसान काही नाही. या अळ्या पिकांच्या मुळांचे फिड खाऊन जगत असतात. 

दरम्यान, फंगस नँट लार्वी असे या अळ्यांचे नाव असून, त्या बुर्शी खाऊन जगतात. त्यांची वाढ होत असते. या अळ्यांमुळे मानवजातीला कोणताही धोका नाही, असे कीटकशास्त्राचे प्राध्यापक तुषार उगले यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Much Number of Larvae in Aurangabad