esakal | चिंताजनक! बीडमध्ये म्युकरमायकोसिसचा शेकडा मृत्यूदर १७ टक्के
sakal

बोलून बातमी शोधा

mucormycosis

चिंताजनक! बीडमध्ये म्युकरमायकोसिसचा शेकडा मृत्यूदर १७ टक्के

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड: कोरोना संसर्ग झाल्यानंतर उपचारात अति स्ट्युराईडच्या वापरामुळे नाकात काळी बुरशी तयार होऊन म्युकरमायकोसिस (mucormycosis) हा आजार होत असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. दरम्यान, या आजारामुळे झालेल्या मृत्यूचे शेकडा प्रमाण जिल्ह्यात तब्बल १७ टक्के असल्याचे आकड्यांवरून दिसते. आतापर्यंत १४७ रुग्ण आणि २५ मृत्यूंची अधिकृत नोंद आहे. याचे शेकडा प्रमाण २७ टक्के आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २१६२ कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूंची नोंद आहे. तर, कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूंचे प्रमाण २.४३ टक्के आहे. मात्र, कोरोनापेक्षा म्युकरमायकोसिसच्या आजाराने मृत्यूंचे प्रमाण सातपट अधिक असल्याचे आकडेवारीवरून दिसते.

जिल्ह्यात अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. वैद्यकीय महाविद्यालय असल्याने या ठिकाणी कान-नाक-घसा व डोळ्यांचे स्वतंत्र विभाग आणि तज्ज्ञ उपलब्ध असल्याने या ठिकाणी उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यासह लातूर, नांदेड, परभणी आदी बाहेर जिल्ह्यांतील रुग्णही या ठिकाणी उपचारासाठी आलेले आहेत. शस्त्रक्रियेनंतर मृत्यूंची संख्या नगण्य असली तरी एकूण मृत्यूंची संख्या २५ आहे. आतापर्यंत १८ रुग्ण उपचारानंतर बरे झाल्याची नोंद असून ९८ रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, म्युकरमायकोसिस झालेल्या बहुतांश रुग्णांना कोरोनाची बाधा झालेली आहे.

हेही वाचा: 'पीकविम्याच्या नावावर लूट कधी थांबणार?' अनेक महसूल मंडळांत निराशा

एमआरआय यंत्र नसल्याने मेंदूची तपासणी अशक्य-
अगोदर नाकात तयार होणारी काळी बुरशी हळूहळू डोळ्यांत आणि नंतर मेंदूपर्यंत पसरते. अंबाजोगाईत कान- नाक- घसा आणि डोळ्यांच्याही शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. मात्र, या ठिकाणी एमआरआय हे मेंदूची तपासणी करणारे अद्ययावत यंत्र नसल्याने या रुग्णांमध्ये काळी बुरशी मेंदूपर्यंत गेली का, याची तपासणी व निदान होत नाही.