पाल-मालोद्याची वाडीचा रस्ता चिखलमय

नवनाथ इधाटे
रविवार, 18 ऑगस्ट 2019

फुलंब्री, ता. 17 (जि.औरंगाबाद) : पाल - मालोद्याची वाडीदरम्यानचा तीन किलोमीटरचा रस्ता चिखलमय झाला असून, रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले होते. परंतु संबंधित अधिकारी, कंत्राटदार यांच्या संगनमतातून निकृष्ट झालेल्या कामामुळे रस्ता तयार झाल्यापासूनच झालेल्या डांबरीकरणाची वाट लागली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांतून शाळेत जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांची पंचाईत होत आहे. त्यामुळे या कामाची चौकशी होऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

फुलंब्री तालुक्‍यातील पाल - मालोद्याची वाडी रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दयनीय अवस्था झाली होती. दुचाकीसह चारचाकी वाहनधारकांना या रस्त्यावरून जाणे - येणे म्हणजे जिवावरची कसरत करणेच ठरत होते. अनेक दुचाकीस्वार या रस्त्याने जाता-येताना रस्त्यावरील खड्ड्यांत पडून जखमी झाले आहेत. त्यातच यंदाच्या पावसाळ्यात गतवर्षी पडलेल्या खड्ड्यांत पावसाचे पाणी जाऊन ते खड्डे यंदा आणखी मोठे झाले आहेत. या रस्त्यावरून परिसरातील शेकडो विद्यार्थी रोज पाल व फुलंब्री शहरात शिक्षण घेण्यासाठी जातात.

तसेच दूध घेऊन जाणाऱ्या, इतर कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांची रस्त्यावरून अडचण होत आहे. दहा मिनिटांच्या रस्त्यात शेकडो खड्डे पडल्यामुळे तीन किलोमीटर अंतर पार करण्यासाठी अर्धा - एक तास लागत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

पाच किलोमीटरसाठी
बारा किलोमीटरचा फेरा

पाल फाटा येथील शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्यामुळे फुलंब्री-कान्होरीमार्गे विद्यार्थ्यांना बारा किलोमीटरचा फेरा घेऊन जा-ये करावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यास उशीर होतो.
- भास्कर साळवे, स्कूलबस चालक, मॉडर्न इंग्लिश स्कूल, पाल फाटा.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mud on pal-malodyachi wadi road