मुदखेडचे नगराध्यक्ष अडकले  लाच लुचपतच्या जाळ्यात

mudkhed
mudkhed

मुदखेड (नांदेड) : येथील नगरपालिकेचे विद्यमान नगराध्यक्ष मुजीब अन्सारी हे आज लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने मुदखेड शहरात व राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

कधी काळी पोलिस व मुदखेड येथील उर्दू शाळेचे मुख्याध्यापक असणाऱ्या आणि सध्या मुदखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष असणाऱ्या मुजीब अहेमद अन्सारी आणि त्यांचा एक सहकारी दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तिन लाख बारा हजार रूपयांची लाच स्वीकारताना अटक केली.

मुदखेड नगरपरिषदेमध्ये सबकंत्राटदार असणाऱ्या बजरंग  खोडके यांचे बिल काढून देण्यासाठी मुदखेडचे नगराध्यक्ष मुजीब अहेमद अन्सारी यांनी एका व्यक्तीकडे सदरील रक्कम ठेवण्यास सांगितले यावरून तिन लाख बारा हजार रूपये दिले. त्यांच्या कामाचे शिल्लक राहिलेले देयक आणि सुरक्षा ठेव रक्कम ३४ लाख ८४ हजार रूपये यावर स्वाक्षरी करून देण्यासाठी नगराध्यक्ष मुजीब जहागीरदार यांनी १७% प्रमाणे पाच लाख ९२ हजार रूपये लाच मागत असून, एकत्रीत रक्कम ५ लाख रूपये दिले, तरच देयक स्वाक्षरी करणार असे सांगत असल्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ता. १ ऑगस्ट) रोजी केली  होती. त्यानुसार या विभागाने शुक्रवारी मुदखेड येथे पंचासमक्ष मुजीब अहेमद अन्सारी जहागीरदार यांचा साथीदार मोहम्मद अलिम म. एजाज यांना ठरलेली रक्कम दिली. या वेळी त्यांना व त्यांच्या साथीदाराला पकडण्यात आले असल्याचे लाच लुचपत विभागाकडुन सांगण्यात आले.

शुक्रवारी तिन लाख बारा हजार रूपये लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मुदखेड पाली केले नगराध्यक्ष मुजीब अहमद अन्सारी व त्यांचा साथीदार मोहम्मद अली मोहम्मद एजाज या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले आहे. या दोघांविरूद्ध मुदखेड पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यंत सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com