मुक्ताराम डुमे यांची नापीकस कंटाळुन आत्महत्या

मुक्ताराम डुमे यांची नापीकस कंटाळुन आत्महत्या

वालुर (सेलू)- येथील रहिवासी मुक्ताराम सखाराम डुमे (वय 60 वर्षे) या शेतकऱ्याने मंगळवारी (ता.27) सकाळी सततच्या नापीकीला कंटाळून स्वतःच्या शेतातील बोरीच्या झाडास गळफास लावून आत्महत्या केली असल्याची घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत शेतकरी मुक्ताराम सखाराम डुमे हे सकाळीच गावालगतच्या शेतात पिकाला पाणी देतो असे सांगून घरुन गेले. परंतु, दिवसेंदिवस नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत असुन नापीकी होत असल्याने शेतीला लागलेला खर्चही निघत नसल्याने बँकेचे कर्ज व इतर कर्ज फेडायचे या विवंचनेत त्रस्त झालेल्या मुक्ताराम सखाराम डुमे या शेतकऱ्याने अखेर आपले जीवन संपवले असल्याने गावात शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पुतण्या शंकर नागनाथ डुमे यांच्या खबरीवरुन सेलू पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली दुपारी वालुरात त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस.पी.चौरे हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com