कर चुकविण्यासाठी एकाच तिकिटावर अनेकांची बुकिंग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019

उदगीर - करमणूक कर चुकविण्यासाठी उदगीरमधील मल्टिप्लेक्‍सने एकाच तिकिटावर अनेकांची बुकिंग करण्याची नामी युक्ती शोधून काढण्यात आली आहे. सर्वत्र ऑनलाइनचा बोलबाला असताना असे पावतीबुकाद्वारे एकाच तिकिटावर अनेकांची बुकिंग करीत शासनाचा लाखो रुपयांचा कर चुकविलाच जात आहे.

उदगीर - करमणूक कर चुकविण्यासाठी उदगीरमधील मल्टिप्लेक्‍सने एकाच तिकिटावर अनेकांची बुकिंग करण्याची नामी युक्ती शोधून काढण्यात आली आहे. सर्वत्र ऑनलाइनचा बोलबाला असताना असे पावतीबुकाद्वारे एकाच तिकिटावर अनेकांची बुकिंग करीत शासनाचा लाखो रुपयांचा कर चुकविलाच जात आहे.

पूर्वी करमणूक कराबाबत महसूल प्रशासनाचे नियंत्रण होते. मात्र, नवीन जीएसटी प्रणालीमुळे आता ते राहिले नाही. या बाबीचा गैरफायदा घेत मल्टिप्लेक्‍स आता एकाच तिकिटावर अनेकांची नोंदणी करून कर चुकवीत आहेत. प्रेक्षक जेव्हा तिकीट खरेदी करतात तेव्हा स्वतंत्र तिकीट देणे अपेक्षित असते; मात्र मल्टिप्लेक्‍समध्ये एकाच तिकिटावर हातानेच तीन-चार सीट क्रमांक टाकून प्रेक्षकांना दिले जात आहेत. यामुळे मल्टिप्लेक्‍सला केवळ एकाच तिकिटाचा कर भरावा लागतो. इतर प्रेक्षकांचे पैसे थेट मल्टिप्लेक्‍सला मिळतात.

आणखी एक कडी म्हणजे तिकिटसोबतच मध्यंतरासाठी पाण्याची बाटली आणि पॉपकॉर्नसाठी वेगळे पैसे घ्यायचे; मात्र त्याची ना पावती, ना कोठे नोंद केली जाते. पाणीसुद्धा सीलबंद बाटलीमधील नाही, तर खुल्या प्लॅस्टिक बाटलीमधून दिले जाते. यातून प्रेक्षकांची फसवणूक होते; मात्र याबाबतची पावतीच प्रेक्षकांकडे नसल्यामुळे तक्रारच करता येत नाही.

करमणूक कराबाबत मल्टिप्लेक्‍सची जुलै २०१७ पासून तपासणी करण्यात आली नाही. नवीन आकारणीप्रमाणे किती जणांकडे बाकी आहे अथवा किती जणांनी भरले आहेत याबाबत माहिती या जीएसटीमुळे आमच्याकडे येत नाही.
- सत्यकांत थोंटे, लिपिक, तहसील कार्यालय, उदगीर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Multiflex Ticke Booking tax Cheating