मुनगंटीवारांच्या वाहनांचा ताफा नांदेडमध्ये अडविला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

नांदेड - राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार नांदेडच्या दौऱ्यावर आल्यानंतर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी "रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले. या वेळी मुनगंटीवार यांच्या वाहनांचा ताफा तरोड्यातील कॅनॉल रस्ता येथे रविवारी अडविण्यात आला. 

शेतकरी कर्जामुळे, तसेच नापिकीमुळे आत्महत्या करत आहेत, शेतमालाला भाव नाही, यवतमाळ जिल्ह्यातील युवा शेतकरी साहेबराव करपे यांनी पत्नी मालती व चार मुलांसह जेवणात विष कालवून आत्महत्या केली. त्या पहिल्या शेतकरी आत्महत्येला 31 वर्षे पूर्ण झाली, तरीही या परिस्थितीत काही फरक पडलेला नाही. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने कुठलेही ठोस पाऊल उचलले नाही, अजूनही शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे. शासनाला याचे कुठलेही सोयरसुतक नाही, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, यासह इतर विविध मागण्या व समस्यांना घेऊन स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे माधव पाटील देवसरकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या वाहनांचा ताफा कॅनॉल रस्ता येथे अडविला; परंतु अशा परिस्थितीतही मंत्रिमहोदयांनी खाली उतरून शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या नाहीत, त्यामुळे मुनगंटीवार व भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.

Web Title: Mungantiwar vehicles fleet caused in Nanded