महापालिका आयुक्तांवर हक्कभंग आणणार - इम्तियाज जलील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

आयुक्त महापौरांच्या हातची कठपुतली म्हणुन काम करीत आहेत. त्यांची लेखी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली. शिवाय त्यांच्यावर हक्कभंगही आणणार असल्याचे एमआयएमचे राज्य अध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी गुरुवारी (ता. 19) घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

औरंगाबाद - महापालीकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना चार चार महिने पगार मिळत नसल्याने कंत्राटदाराची माहीती तिन महिन्यांपुर्वी आयुक्तांना मागितली. दोनदा पत्र लिहीले तरी खासदार असताना मला अशी उडवाउडवीची उत्तरे देत आहे. मुळात आयुक्त महापौरांच्या हातची कठपुतली म्हणुन काम करीत आहेत. त्यांची लेखी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली. शिवाय त्यांच्यावर हक्कभंगही आणणार असल्याचे एमआयएमचे राज्य अध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी गुरुवारी (ता. 19) घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

पालीकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना हातात आठ हजार रुपये पगार मिळत असल्याचे कर्मचाऱ्यांनी मला सांगितले. चार चार महिने पगार होत नाही. मात्र, कंत्राटदाराला दर महिन्याला पैसे दिले जातात. मग त्या कर्मचाऱ्यांवर अन्याय का? एमआयएमच्या नगरसेवकांना माहीती अधिकारातही माहीती द्यायला महापौरांनी लेखी पत्र देत मज्जाव केला आहे. मात्र, विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांच्या अधिकारात ती कागदपत्रे मिळवली. मुळात आयुक्तांच्या मर्जीने हे सुरु असल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे महापालीका 15 हजार रुपये देते. मग बाकी पैसा जातो कुठे असा सवाल करत या कारभारावर इम्तियाज जलील यांनी शंका उपस्थित केली. 

दहा दिवसांची डेडलाईन 
डेंगीचा शहरात कहर झाला असतांना कोणतीही उपाययोजना होत नाही. एन 12 आणि मध्यवर्ती जकात नाका येथील समस्या वाढत आहे. तेथील कचरा दहा दिवसांत हटवा अन्यथा एमआयएम तेथे तोडफोड करेल, असा इशारा आयुक्तांना इम्तियाज जलील यांनी दिला. तसेच जॉब अलर्ट मोफत उपक्रम सुरु करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Commissioner Violation Imtiaz Jalil