मोकाट कुत्र्यांवर महापालिका खर्च करणार 25 लाख 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

महापालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी या आर्थिक वर्षात 25 लाख रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.

औरंगाबाद - कचऱ्यामुळे मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आणि सर्वसामान्य नागरीकांना, वाहनधारकांना मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढू लागला. यामुळे महापालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी या आर्थिक वर्षात 25 लाख रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पुणे येथील ब्ल्यु क्रॉस या संस्थेला काम देण्यात येणार असून यासंदर्भात मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठराव ठेवण्यात येणार आहे. 

मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांचे निर्बिजीकरण करण्यात येणार आहे. यासाठी प्रति मोकाट कुत्र्यावर उपचार करण्यासाठी 900 रुपये तर पिसाळलेल्या, धोकादायक बनलेल्या मोकाट कुत्र्याला दया मरण देण्यासाठी प्रत्येकी 300 रुपये महापालिका प्रशासन संबंधित संस्थेला देणार आहे. 2018 - 19 या अर्थिक वर्षात मोकाट कुत्र्यांवर 25 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव येत्या शनिवारी (ता. 7) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

  • 'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. 
  • शेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठीक्लिक करा. 
  • राजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.
Web Title: The municipal corporation will spend 25 lakh on street dogs