उमेदवारांचे राजकीय भवितव्य सीलबंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

लातूर - लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, निलंगा व औसा या चार नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी बुधवारी (ता. १४) ७०.७४ टक्के मतदान झाले. चार नगराध्यक्षपदांसाठी ३८; तर १०१ नगरसेवकपदांसाठी ५०१ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदारांनी सीलबंद केले. सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक चुरशीची केली होती. त्यामुळेच जास्तीत जास्त मतदार कशा पद्धतीने मतदान करतील याकडे लक्ष देण्यात आले होते.

यातून या चार नगरपालिकांसाठी चांगले मतदान झाले आहे. हे सर्व मतदान शांततेत झाले. गुरुवारी (ता. १५) होत असलेल्या मतमोजणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला. या चारपैकी तीन पालिकांवर काँग्रेसचा झेंडा होता; पण या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. 

याकरिता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एकाच दिवशी चारही ठिकाणी जाहीर सभा घेऊन मतदारांना भाजपकडे वळविण्याचा प्रयत्न केला. त्यांना किती यश मिळाले ते मतमोजणीतून दिसणार आहे. भाजपसोबतच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, एमआयएमसारख्या पक्षानेदेखील ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. चारही ठिकाणी नगराध्यक्षपदांसाठी बहुरंगी लढती झाल्या आहेत. तसेच वॉर्डावॉर्डांतदेखील चुरशीच्या लढती झाल्या आहेत.  या चार नगराध्यक्षपदांसाठी ३८ जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तर उदगीर येथील ३८, अहमदपूर येथील २३ , निलंगा येथील २० व औसा येथील २० अशा १०१ नगरसेवकपदांसाठी ५०१ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. २०३ मतदान केंद्रावर बुधवारी मतदान झाले. सकाळपासूनच चारही पालिकांच्या मतदानासाठी मतदारांचा उत्साह दिसून आला. ज्येष्ठ नागरिकदेखील मतदानासाठी येताना दिसून येत होते. यातूनच दुपारी साडेतीनपर्यंत औशात ६१.०७, उदगीरमध्ये ५६.२८, अहमदपूरमध्ये ५२.२७ व निलंगा येथे ५२.७२ टक्के मतदान झाले होते. दुपारनंतरही मतदारांचा ओघ कायम होता. जास्तीत जास्त मतदार कसे मतदान केंद्रावर येऊन मतदान करतील याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून केला होता. त्यामुळेच सायंकाळी या चार निवडणुकीतील मतदानाची सरासरी टक्केवारी ७०.४४ इतकी झाली.

यात उदगीर पालिकेसाठी ६९.७२ टक्के, औशात ७५.५८ टक्के, अहमदपूरमध्ये ६८.९८ टक्के व निलंगा येथे ६७.७१ टक्के मतदान झाले.

Web Title: municipal election latur district