पालिकेच्या निवडणुकीत ऑनलाईनच अर्ज 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

लातूर - राज्यातील पहिल्या टप्प्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीत ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरण्यास मिळालेला प्रतिसाद पाहता दुसऱ्या टप्प्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीत ऑनलाईन उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने व निवडणूक विभागाने तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आता विविध राजकीय पक्षांच्या तसेच अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरू इच्छिणाऱ्यांना ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने भरला जातो याची माहिती करून घ्यावी लागणार आहे. त्यात थोडीही चूक झाली तर अर्जच अवैध ठरणार आहे. 

राज्यात सध्या नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत. यावर्षी पहिल्यांदाच ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा प्रयोग होत आहे. त्याला काही प्रमाणात विरोध झाल्याने पहिल्या टप्प्यात शेवटच्या क्षणी शिथिलता देण्यात आली होती; तरीदेखील पहिल्या टप्प्यात ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. दुसऱ्या टप्प्यात केवळ दोनच जिल्ह्यांतील पालिकांच्या निवडणुका आहेत. त्यात लातूर जिल्ह्याचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, उदगीर व अहमदपूर या चार नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्यात औशात 20, निलंग्यात 20, उदगीरमध्ये 38 तर अहमदपूरमध्ये 23 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या चारही ठिकाणी नगराध्यक्ष जनतेतूनच निवडला जाणार आहे. या चारही पालिकांच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज आता ऑनलाईनच भरावे लागणार आहेत. त्याकरिता राजकीय पक्षाच्या तसेच अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करू इच्छिणाऱ्यांना ही प्रक्रिया समजून घ्यावी लागणार आहे. एखादी चूकदेखील उमेदवारी अर्ज बाद ठरवू शकते. त्यामुळे आता राजकीय पक्षांना उमेदवारांच्या प्रबोधनावर भर द्यावा लागणार आहे. 

सायबर कॅफेचालकांना प्रशिक्षण 

लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, उदगीर व अहमदपूर या चार नगरपालिकांच्या निवडणुकीत ऑनलाईन उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. प्रशासनाच्या वतीने त्याची तयारी सुरू आहे. उमेदवारांना खासगी सायबर कॅफेवरूनही अर्ज दाखल करता येणार आहे. याकरिता सायबर कॅफेचालकांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे. 
पांडुरंग पोले, जिल्हाधिकारी. 

Web Title: Municipal elections online application