करबुडव्या शासकीय कार्यालयांविरुद्ध महापालिकेची शनिवारपासून मोहीम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

औरंगाबाद - पाणी व विजेशी संबंधित असलेली बिले महापालिका भरणार आहे. महापालिकेला आर्थिक समस्येतून बाहेर काढण्यासाठी मालमत्ता कर व पाणीपट्टीची वसुली पूर्णपणे करावी लागणार आहे. मालमत्ता कराची व पाणीपट्टीची थकबाकी मार्चअखेरपर्यंत न भरणाऱ्या शासकीय संस्थांविरुद्ध शनिवारपासून (ता.एक) कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्‍त ओमप्रकाश बकोरिया यांनी सांगितले. 

संपूर्ण मार्च महिना विशेष वसुली मोहीम राबवण्यात आली आहे. वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रशासनाच्या हाती आणखी चार दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सध्या फक्‍त वसुलीवरच लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सर्व शासकीय संस्था ज्यांच्या त्यांच्या वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करत आहेत. महापालिकेला ज्या शासकीय संस्थांची देणी आहेत त्यात महावितरण व सिंचन यांना प्राधान्याने प्रशासन बिल भरणा करणार आहे. कारण या दोन्ही विभागांशी निगडित विषय जनतेच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहेत, असे श्री. बकोरिया म्हणाले. ज्या शासकीय विभागाला महापालिकेने देणे आहे तसेच येणे आहे. महापालिका पाणीपट्टी व मालमत्ता कराची वसुली करताना देणे असलेल्या रकमा वजा करुन उर्वरित रकमा वसूल करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. 

Web Title: Municipal government offices Saturday campaign against tax