हिंगोली जिल्ह्यात नगरपालिकांचे कामकाज ठप्प

हिंगोली जिल्ह्यात नगरपालिकांचे कामकाज ठप्प

हिंगोली : अर्धापूर (जि. नांदेड) येथील नगर पंचायतीचे मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांना कर्तव्यावर असताना त्यांना एका नगरसेवकाने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. या प्रकरणाचा निषेध म्‍हणून हिंगोली, कळमनुरी, औंढा, वसमत व सेनगाव येथील नगर परिषद कर्मचारी व महाराष्‍ट्र राज्य सफाई कर्मचारी संघटनेतर्फे मंगळवारी (ता. २१) एकदिवसीय कामबंद आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

हिंगोली अर्धापूर येथील शिवीगाळ करणाऱ्या नगरसेवकाचे सदस्यत्‍व रद्द करावे, अशी मागणी करत येथील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. त्यानंतर उपजिल्‍हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे, अनिकेत नाईक, श्याम माळवटकर, डी. बी. ठाकूर, रघुनाथ बांगर, विजय इटकापल्‍ले, किशोर काकडे, गजानन आठवले, बाबूराव गायकवाड, सफाई कर्मचारी संघटनेचे जिल्‍हाध्यक्ष विजय शिखरे, सचिव झिंगराजी वैरागड, शहराध्यक्ष सुरेश वाव्हळे, भिकू भुजवणे, बालाजी आठवले, चंद्रभागा पाटोळे, बाबूअप्पा गायकवाड, मारोती गवारे, कैलास कांबळे, विशाल ठोके, रामभाऊ कांबळे, संजू गायकवाड आदींची उपस्‍थिती होती.

हेही वाचा-तुम्ही तुमच्याकडील पुरावे दाखवा, परभणी जिल्ह्यातील साईभक्त भूमिकेवर ठाम​

कळमनुरीत कामबंद आंदोलन

कळमनुरी : अर्धापूर मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या निषेधार्थ कळमनुरी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी कामबंद आंदोलन केले. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेमुळे नगर पंचायत व नगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मारहाण करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी करत आंदोलन करण्यात आले. यामध्ये पालिका कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी डी. ए. गव्हाणकर, आनंद दायमा, देवराव बोलके, मोहम्मद जाकीर हुसेन, गंगाधर वाघ, अभियंता निकेत यरमळ, श्री. डाखोरे, धोंडिबा डुकरे, महादेव घुघसे, मोहम्मद नदीम, मोहम्मद मुक्तार, मनोज नकवाल, मोहम्मद मगदूम, त्र्यंबक जाधव यांच्यासह महिला कर्मचारीही आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

अर्धापूर येथील घटनेचा औंढा येथे निषेध

औंढा नागनाथ : अर्धापूर (जि. नांदेड) येथील नगर पंचायतीचे मुख्याधिकारी कर्तव्यावर असताना त्यांना नगरसेवकाने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेच्या निषेधार्थ औंढा नागनाथ येथील नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून घटनेचा निषेध नोंदविला. त्यानंतर तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना निवेदन देण्यात आले. या वेळी निरीक्षक उत्तम जाधव, अव्वल कारकून विजय महामुने, अभियंता महादेव बळवंते, मनोहर रणखांबे, अनिल नागरे, दिनकर मोरे, विष्णू रणखांबे, राधा काळे, मंजुषा राठोड, नंदा अंभोरे, सतीश रणखांबे, मारुती पांढरे, लतिफ काझी आदी नगर पंचायत कर्मचाऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

यावरही क्लिक करा-प्रधानमंत्री मुद्रा योजनेने दिली ‘नॅचरल दिशा’ ​

सेनगाव, वसमत येथील कामकाज ठप्प


सेनगाव: अर्धापूर (जि. नांदेड) येथील नगर पंचायतीचे मुख्याधिकारी कर्तव्यावर असताना त्यांना नगरसेवकाने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याबद्दल सेनगाव येथील नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय काम बंद आंदोलन करीत घटेनचा निषेध व्यक्त केला. यामध्ये कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग होता.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com