#ThursdayMotivation 'ति'ने लिव्हर दिले, म्हणून वाचला वडिलांचा जीव!

file photo
file photo

नांदेड :  कुटुंबावर जेव्हा- जेव्हा कठिण प्रसंग येतो. तेव्हा सर्व प्रकारच्या संकटाचा सामना करण्यासाठी घरातील कर्ता पुरुष नेहमीच सर्वात पुढे असतो. कुटुंबावरचे संकट परतविण्यासाठी अनेकांनी जिवाची बाजी लावल्याचे अनेक उदाहरणे आहेत. परंतु नांदेडची अंकिता ही त्याला अपवाद ठरली आहे. तीने वडीलांना गंभीर आजारातुन बाहेर काढण्यासाठी स्वतःचे लिव्हर दान करूण आपल्या जन्मदात्याला जीवदान दिले होते. या तिच्या धाडसी निर्णयाची नांदेड शहर महापालिकेने दखल घेतली आहे. लवकरच तिचा महापालिकेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

काय आहे प्रकरण... ?
नांदेड महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असलेले संजय जाधव यांना आक्टोबर २०१८ मध्ये पोटाच्या आजारावर उपचारासाठी स्थानिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. सर्व तपासणीअंती डॉ. सुशील राठी यांनी संजय जाधव यांना हिपॅटायटीस ‘बी’ या आजाराचे निदान झाले होते. त्या नंतर जाधव यांना हैद्राबाद येथील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. या ठिकाणी आठवडाभर उपचार केल्यानंतर त्यांना या आजारातुन काही प्रमाणात सुटका झाली होती. परंतु जानेवारी २०१९ मध्ये पुन्हा आजार बळावल्याने त्यांना हैद्राबादच्या ग्लोबल हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले.

परंतु त्यांचा जुना हिपॅटायटीस ‘बी’ या आजाराने त्यांचे ८० टक्के लिव्हर ग्रासून टाकले होते. त्यामुळे त्यांना लिव्हर बदलण्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण लिव्हर देणार कोण? हा मोठा प्रश्न होता. दरम्यान वडीलांच्या गंभीर आजारामुळे घरातील शांतता भंग झाली होती. काय करावे कुणालाच काहीच सुचत नव्हते. घरातील सर्वांचे रक्तगट तपासले गेले. यात अंकिता शिवाय कुणाचाही रक्तगट वडीलांना लागु पडत नव्हता. आणि मोठ्या धाडसाने अंकिता वडीलांच्या आजारपणात पुढे आली.

असे केले धाडस
पुणे येथिल नामांकित महाविद्यालयाची विद्यार्थीनी आहे. दरम्यान तिची ‘एमसीए’ची परीक्षा तोंडावर होती. त्यामुळे अंकिता तितक्याच धैर्याने पुढे परिक्षेला जामोरे जाणे गरजेचे होते. कारण तिचा ‘ओ’ पॉझिटीव्ह’ हा रक्तगट वडीलांच्या रक्तगटाशी जुळला होता. आणि संजय जाधव यांच्यावर लिव्हर प्रत्यारोपनाची सात जून ही तारिख निश्चित झाली होती. तेंव्हा तिला परिक्षेसोबतच स्वतःवर नियंत्रण ठेवणे तितकेच गरजेचे होते.  एेनवेळी लिव्हर प्रत्यारोपनाची तारिख बदलण्यात आली. आणि सात जून एैवजी नऊ जुनला पुन्हा तारिख निश्चित झाली होती. त्या पूर्वी अंकीताला सर्व प्रकारच्या तपासण्यांना सामोरे जावे लागणार होते. यात ती पास झाली आणि ८० टक्के लिव्हर खराब झालेल्या वडीलांना तिने ६४० ग्रॅम लिव्हर दान करुन वडिलांना नवजिवन मिळवून दिले होते. सध्या दोघांची प्रकृती ठणठणीत आहे..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com