औरंगाबादेत पस्तीस वर्षीय कामगाराचा खून?

मनोज साखरे
बुधवार, 4 एप्रिल 2018

खुनाचा प्रकार?
‌मृत समाधान यांच्या डोक्याला मार असून त्यांना वाळूत पुरण्यात आले होते. त्यामुळे हा खुनाचा प्रकार असून मृतदेह लावण्याचाच प्रयत्न होता असा संशय पोलिसांना आहे.

औरंगाबाद : पस्तीस वर्षीय कामगाराचा मृतदेह वाळूत पुरलेल्या अवस्थेत सापडला. हि खळबळजनक घटना बुधवारी (ता. 4) उघडकीस आली. कामगाराचा खून केल्याची बाब समोर आली आहे. 

समाधान किसन मस्के (वय :35, रा. नवनाथनगर, हडको एन-11) असे मृताचे नाव आहे. तो हडकोत किरायच्या खोलीत राहत होता. चिखलठाणा येथे एका कंपनीत तो वेल्डिंगचे काम करीत होता. पंधरा दिवसांपूर्वीच त्याला काम सोडावे लागले. त्यामुळे तो नवीन काम शोधात होता. आठ दिवसांपूर्वी ते पत्नी व दोन मुलांसह गावी गेले होते. तेथुन सर्वजण परत शहरात आले होते.

दोन दिवसांपूर्वी सायंकाळी दुचाकी घरी ठेवून बाहेरून येतो असे पत्नीला सांगून ते निघून गेले परंतु घरी परतले नाही. त्यानंतर त्यांचा मृतदेह वाळूत आढळला. या घटनेनंतर पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, सहायक आयुक्त नागनाथ कोडे, सिडको ठाण्याचे पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मृतांची व घटनास्थळाची त्यांनी पाहणी केली. यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला. 

खुनाचा प्रकार?
‌मृत समाधान यांच्या डोक्याला मार असून त्यांना वाळूत पुरण्यात आले होते. त्यामुळे हा खुनाचा प्रकार असून मृतदेह लावण्याचाच प्रयत्न होता असा संशय पोलिसांना आहे.

Web Title: murder in Aurangabad