जालन्यात तरुणाचा पोटात चाकूने वार करून खून

उमेश वाघमारे
गुरुवार, 25 एप्रिल 2019

जालना : शहरातील कुंडलीका नदीच्या काठावर असलेल्या एका मंदिर परिसरात एका तरुणाचा खून झाल्याची घटना गुरुवारी (ता.25) सकाळी 11 वाजता उघडकिस आली.  कुमार शरदचंद्र झुंनजुर (वय 28 रा. लक्ष्मीनारायण पूरा) असे मयतांचे नाव आहे. दरम्यान मृताच्या पोटात खुपसलेला चाकू तसाच आहे. 

शहरातील सिद्धि विनायकनगरच्या पाठिमागे मल्लावं समाजाचे तुळजाभवानी मातेचे मंदिर आहे. हा भाग  तसा अडगळीचा आहे. याच मंदिराच्या आवारात  गुरुवारी (ता.25) सकाळी 11 वाजन्याच्या सुमारास एक तरुणाच्या पोटात चाकू खुपसुन खून झाल्याचे घटना उघडकिस आली. कुमार शरदचंद्र झुंनजुर (वय 28 रा. लक्ष्मीनारायण पूरा) असे मयत तरुणाचे नाव आहे. या मयत तरुणाच्या पोटात चाकूचे पाच ते सहा  वार केल्यानंतर मारेकार्याने मयताच्या पोटात खुपसलेला चाकू तसेच ठेवल्याचे दिसून आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधिक्षक ( गृह) अभय देशपांडे,  उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय लोहकरे, पोलिस उपनिरीक्षक जयसिंग परदेशी यांच्या पोलिस अधिकारी, फिंगर प्रिंट, श्वास पथक घटनास्थळी दखाल झाले होते. 

पोलिसांकडून या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Web Title: murder of a boy in Jalna