इम्रान मेहंदीसह आठ जणांना जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - माजी नगरसेवक सलीम कुरैशी यांच्या खूनप्रकरणी ‘सुपारी किलर’ इम्रान मेहंदीसह आठ जणांना मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली; तसेच प्रत्येकाला १५ लाख ११ हजार रुपये असा १ कोटी २० लाख ८८ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. या प्रकरणात ६१ साक्षीदार तपासण्यात आले, तर ११ साक्षीदार फितूर झाले होते. 

औरंगाबाद - माजी नगरसेवक सलीम कुरैशी यांच्या खूनप्रकरणी ‘सुपारी किलर’ इम्रान मेहंदीसह आठ जणांना मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली; तसेच प्रत्येकाला १५ लाख ११ हजार रुपये असा १ कोटी २० लाख ८८ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. या प्रकरणात ६१ साक्षीदार तपासण्यात आले, तर ११ साक्षीदार फितूर झाले होते. 

तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त संदीप भाजीभाकरे यांच्या पथकाने कुरैशींचा खून करणाऱ्या इम्रान मेहंदी ऊर्फ दिलावर शेख नसीर, नुमान खान अब्दुल कय्युम, महंमद अश्‍फाक ऊर्फ अशू अजम खान (तिघेही रा. आसेफियाँ कॉलनी), सय्यद नाजेर सय्यद नासेर अली (कासंबरीनगर), शेख इम्रान ऊर्फ सुलतान शेख (कोरखैरानी, ह.मु. कटकटगेट), सय्यद जहीर ऊर्फ शेरा बाखर कुरेशी (चेलिपुरा), जुबेर खान शबीर खान (कैसर कॉलनी), हबीब खालेद हबीब महदम (युनूस कॉलनी), महंमद शोएब मोहंमद सादिक (बाबर कॉलनी), फरीदखान फेरोज खान (शहानगर बीड बायापास), शेख हसन शेख हुसेन (शरीफ कॉलनी) या अकरा जणांना अटक केली. या अकरा जणांनी ११ मार्च २०१२ रोजी पंचांसमक्ष सलीम कुरैशीला गळ्याइतक्‍या खोल खड्ड्यात गाडले आणि त्याचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची कबुली दिली होती.

यांना झाली शिक्षा
न्यायालयाने इम्रान मेहंदी, सय्यद नाजेर, शेख इम्रान ऊर्फ सुलतान, सय्यद जहीर ऊर्फ शेरा, नुमान खान, जुबेर खान, हबीब खालेद, फरीदखान फेरोज खान या आठ जणांना खून, अपहरण, पुरावा नष्ट करणे या कलमांखाली प्रत्येकी जन्मठेप, प्रत्येकी ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन वर्षे सक्तमजुरी, मोक्काअंतर्गत ३, १, २, ३ (१) २, आणि ३ व ४ या तिन्ही कलमांन्वये प्रत्येकी जन्मठेप, प्रत्येकी ५ लाख रुपये दंड, दंड न भरल्यास तीन वर्षे सक्तमजुरी. या आठ आरोपींकडून १ कोटी २० लाख ८८ हजार रुपये दंड वसूल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. गुन्ह्यात सबळ पुराव्याअभावी महंमद शोएब, शेख हसन आणि महंमद अश्‍फाक या तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

इम्रानला सोडविण्याचा कट उधळला
पिस्तुलाच्या धाकावर पोलिसांवर हल्ला करून सुपारी किलर इम्रान मेहंदीला सोडवून नेण्याचा कट गुन्हे शाखेने उधळला. मध्य प्रदेशचे सात शार्पशूटर, मेहंदी गॅंगमधील स्थानिक अशा अकरा संशयितांना पिस्तूल, काडतुसांसह अटक केली. नारेगाव भागात ही कारवाई करण्यात आली. 

Web Title: Murder Case Imran Mehandi Life imprisonment Punishment Crime