"तो' प्रियकर चौकशीसाठी ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

भोकरदन - लग्नापूर्वी गरोदर राहिलेल्या मुलीच्या खूनप्रकरणी तिच्या प्रियकराला पोलिसांनी शनिवारी भुसावळ तालुक्‍यातून चौकशीसाठी ताब्यात घेतले. मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या वडिलांनी रागाच्या भरात गळा आवळून तिचा खून केल्याची घटना (ता. 26 नोव्हेंबर) समोर आली होती.

पोलिस पथकाने ओझरखेडा (ता. भुसावळ, जि. जळगाव) येथून प्रियकराला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, प्रियकराने 18 जूनला जळगावला विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणी केली होती. त्यांना 18 जुलै ते 16 सप्टेंबरदरम्यान कार्यालयात येऊन विवाह करण्यासाठी वेळही दिली होती; परंतु त्याच्या घरून काहींचा नकार असल्याने लग्न लांबणीवर पडले. अखेर 25 नोव्हेंबरला जळगावजवळील आसोदा येथे मुलीच्या नातेवाइकांच्या घरी लग्न करण्याचे ठरले होते. परंतु पैशांच्या तरतुदीअभावी लग्न होऊ शकले नाही, अशी माहिती समोर आली आहे.

पुण्यात जुळले प्रेम
खून झालेली मुलगी (वय 20) पुण्यात शिक्षण घेत खासगी नोकरी करीत होती. येथील अपंग प्रशिक्षण कार्यशाळेत एक वर्षापूर्वी दोघांचे प्रेम जुळले. त्यातून त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.

वडिलांनीच केला खून
लग्नापूर्वी मुलगी गरोदर राहिल्याचे लक्षात येताच मुलीचे वडील प्रियकराच्या गावाला गेले; मात्र त्याची भेट व संपर्क झाला नाही. तेथून परतताना वाटेत वडिलांनी नातेवाइकांच्या मदतीने आपल्या मुलीचा खून करून धावडा शिवारात मृतदेह फेकला होता. या प्रकरणी वडिलांसह चौघे अटकेत असून, त्यांना मंगळवारपर्यंत (ता. 4) न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे.

Web Title: Murder Case Lover Inquiry Crime