साथीदार पाकीटमारानेच केला खून

साथीदार पाकीटमारानेच केला खून

औरंगाबाद - मुकुंदवाडी, राजनगर भागात पत्र्याच्या शेडमधील कुजलेल्या अर्धवट मृतदेहाची ओळख पटली असून, खुनाचीही उकल झाली.

पाकीटमारानेच सहकाऱ्याचा खून केल्याचे समोर आले आहे. त्याला गुन्हे शाखेने सोमवारी (ता. १७) परतूर (जि. जालना) येथून बेड्या ठोकल्या. चोरीच्या वस्तू सांभाळण्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. 

पांडुरंग रामा पवार (वय ४५, रा. परभणी) असे मृताचे नाव आहे. रमेश दशरथ जाधव (वय ३२, राजनगर) असे संशयिताचे नाव आहे. राजनगरात तेजबहादूर यादव यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये ३१ ऑगस्टला कुजलेला मृतदेह आढळला होता. या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची १६ सप्टेंबरला नोंद झाली. यानंतर गुन्हे शाखेने तपास सुरू केला. अनेक जणांची चौकशी केली. त्यात एकाने गुन्ह्याच्या उकलीसाठी पूरक माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी रमेश ऊर्फ रम्या याचा शोध सुरू केला असता तो परतूर रेल्वेस्थानकात असल्याची बाब पोलिसांना समजली. पोलिसांनी परतूर रेल्वेस्थानकातून त्याला अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक विजय जाधव, हवालदार संजय धुमाळ, सुरेश काळवणे, रमेश भालेराव, समद पठाण, हिरासिंग राजपूत, भाऊलाल चव्हाण, संदीप बीडकर, शेख नवाब, विरेश बने, संजीवनी शिंदे यांनी केली.

अशी झाली होती ओळख
पांडुरंग रेल्वेत पत्नीसह भीक मागायचा. रमेश पाकीटमारी करीत होता. भीक मागण्यापेक्षा माझ्यासोबत चल, माझ्या चोरलेल्या वस्तू सांभाळ, मी तुला सांभाळतो, असे सांगून रमेशने पांडुरंग व त्याच्या पत्नीला सोबतीला घेतले होते; परंतु नंतर दोघांत साहित्य सांभाळण्यावरून वाद झाला व यातून पांडुरंगचा त्याने खून केल्याची बाब समोर आली.

‘त्या’ धाग्याने उकल
चोरीनंतर राजनगर येथील पत्र्याच्या शेडसमोरील मोडक्‍या घरात रात्री रमेश, पांडुरंग व त्याची पत्नी आश्रय घेत व पहाटे परत रेल्वेने जात होते. ही बाब एकाने पोलिसांना सांगितली. हाच धागा पकडून पोलिसांनी तपास केला आणि रमेशला परतूरमध्ये गाठले.

असा केला खून
दीड महिन्यापूर्वी नेहमीप्रमाणे राजनगर येथील मोडक्‍या घरात आल्यानंतर वस्तू सांभाळण्यावरून रमेश व पांडुरंगमध्ये वाद झाला. रमेशने त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर पाण्यात बुडवून ठार केले. पुरावा नष्ट करण्यासाठी पत्र्याच्या शेडमध्ये पांडुरंगचा मृतदेह त्याने लपवून ठेवला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com