सरपंचाच्‍या वडिलांचा खून

Murder
Murder

वाळूज - शेतात जनावरे चारायला घेऊन गेलेल्या एका ६५ वर्षीय शेतकऱ्याचा चाकूने वार करून खून केल्याची घटना बुधवारी (ता. २६) सकाळी साडेअकराला मलकापूर शिवारात घडली. मृताच्या १३ वर्षीय नातवावरदेखील चाकू हल्ला झाल्याने तो गंभीर जखमी झाला. दामोधर किसन महारनोर (रा. डोमेगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, दादाराव आण्णा महारनोर असे जखमी नातवाचे नाव आहे. दामेधर महारनोर हे डोमेगाव येथील सरपंच पंढरीनाथ महारनोर यांचे वडील होते.

आजोबा आणि नातू मलकापूर शिवारातील गट क्र. २१ येथे बुधवारी सकाळी काही अंतरावर आपापले जनावरे चारत असताना तेथे शंकर नंदू जगताप (२०, रा. येसगाव) व तीन अनोळखी असे चारजण आले. त्यांनी दादारावर चाकूने हल्ला करून त्याला बाजरीच्या शेतात बांधून टाकले. त्यानंतर आरोपींनी दामोधर महारनोर यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. मग शंकरने दोन बैल, बैलगाडी व एक गाय घेऊन जात असताना बैलगाडीवरील रक्त पाहून राजुरा येथील काही दक्ष नागरिकांनी आरोपीला अडवून डोमेगाव येथील सरपंच पंढरीनाथ महारनोर यांना माहिती दिली.

पंढरीनाथ महारनोर यांनी पुतण्या किशोरला संपर्क केला. त्यानुसार किशोर व त्याचा भाऊ संजय यांनी राजुरा येथे जाऊन नागरिकांनी पकडून ठेवलेले बैल व गाय त्यांचेच असल्याचे ओळखले. गावकऱ्यांनी शंकरला विचारले असता त्याने साथीदारांसह बैल व गाय विक्री करण्याच्या उद्देशाने चोरी केल्याचे सांगितले. त्यांना विरोध करणाऱ्या दामोधर आणि दादाराव यांच्यावर चाकूने हल्ला केल्याचेही त्याने सांगितले. गावकऱ्यांनी शेतात जाऊन पाहिले असता दामोधर आणि नातू दादाराव हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. 

दोघांना जखमी अवस्थेत घाटीत दाखल केले असता दामोधर यांना डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले, तर दादाराव हा गंभीर असून, त्याच्यावर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

खुनाचा गुन्हा दाखल
घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीशकुमार टाक, उपनिरीक्षक प्रीती फड, रविकुमार पवार, अमितकुमार बागूल, सहायक फौजदार दत्तात्रय साठे, प्रदीप बोराडे, एस. ए. वडणेरे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून शंकर जगताप याला ताब्यात घेऊन दोन बैल, एक गाय, बैलगाडी व रक्ताने माखलेला चाकू जप्त केला. प्रकरणी किशोर धोंडिराम महारनोर याच्या फिर्यादीवरून वाळूज पोलिस ठाण्यात शंकर नंदू जगताप व तीन फरार आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नरसिंह पोमनाळकर करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com