पैशांच्या व्यवहारातून मित्राचा खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

पैशांच्या देवाण-घेवाणीतून एकाने चाकूने भोसकून मित्राचा खून केल्याची घटना छत्रपती चौक परिसरात घडली. भाग्यनगर पोलिसांनी मारेकऱ्याला तातडीने अटक केली. नवजीवन कॉलनीतील संदीप सदावर्ते (वय 24) आणि संजय कापुरे (वय 45) या दोघांमध्ये पैसे देण्या-घेण्याचा व्यवहार होता. यातून सदावर्ते यांनी कापुरेला तीस हजार रुपये कामानिमित्त दिले होते.

नांदेड - पैशांच्या देवाण-घेवाणीतून एकाने चाकूने भोसकून मित्राचा खून केल्याची घटना छत्रपती चौक परिसरात घडली. भाग्यनगर पोलिसांनी मारेकऱ्याला तातडीने अटक केली. नवजीवन कॉलनीतील संदीप सदावर्ते (वय 24) आणि संजय कापुरे (वय 45) या दोघांमध्ये पैसे देण्या-घेण्याचा व्यवहार होता. यातून सदावर्ते यांनी कापुरेला तीस हजार रुपये कामानिमित्त दिले होते. कापूरेने त्यातील 20 हजार रुपये परत केले. दहा हजार रुपये तो वेळेत परत करीत नसल्याने सदावर्ते हे त्याला तगादा लावत होते. त्यातून या दोघांत वाद झाला. कापुरेने सदावर्ते यांच्या पोटात चाकूने वार केला. उपचारादरम्यान सदावर्तेंचा मृत्यू झाला. पोलिसांनी कापूरेला अटक केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder Crime

टॅग्स