भाजपच्या माजी नगराध्यक्षांच्या पतीची दगडाने ठेचून हत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

-  भाजपच्या माजी नगराध्यक्षांच्या पतीची हत्या 
- दगडाने ठेचुन केली हत्या धारूर येथील घटना 
- नामदेव शिनगारे यांची हत्या; हत्येच कारण अद्याप अस्पष्ट 
- नामदेव शिनगारे धारूर पालिकेचे कर्मचारी होते

किल्लेधारुर : नगरपालीकेचे माजी कर्मचारी व माजी नगराध्यक्षा सविता शिनगारे यांचे पती नामदेव शिनगारे यांचा भरदिवसा खुन केल्याची घटना सोमवारी (ता.12) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास केज रोड लगत एका शेतात घडली. घटना घडल्यानंतर येथे नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एका ऑयल मिल शेजारी असलेल्या एका सोयाबीनच्या शेतात त्यांचा डोक्यात दगडाने ठेचून खुन केल्याची घटना घडली. या वेळी त्यांची अर्धा किलोमिटर अंतरावर दुचाकी आढळून आली. मृतदेह असलेल्या ठिकाणी दोन दगड आढळून आले. दोन्ही दगड रक्ताने माखलेले होते. एक चष्मा, एक मोबाईल आढळून आला. हा खून कोणी केला हे मात्र अद्याप समजू शकले नाही.

पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात हलविण्यात आला आहे. घटनेच्या पाठीमागे अनेक शक्यता नागरिकांतून व्यक्त होत आसल्या तरी कोणत्या कारणामुळे ही घटना घडली. हे गुन्हा दाखल झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murder of of ex-BJP muncipal Corporation president in beed District