हिंगोली : दाताडा बुद्रूक येथे एकाचा खून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 नोव्हेंबर 2018

या घटनेत जखमी असलेल्या भुजंग शिंदे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी अमोल कैलास शिंदे यांच्या तक्रारीवरून सेनगांव पोलिसांनी सचिन नारायण सुरनर किरण नारायण सुरनर, नितीन विश्वनाथ कवडे, विश्वनाथ नामदेव कवडे, गणेश नामदेव  कवडे  यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक श्री. जाधव पुढील तपास करीत आहेत.

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक येथे मुलीला लग्नाची मागणी घातल्यानंतरही मुलगी का दिली नाही या कारणावरून मुलाच्या कुटुंबीयांनी मुलीच्या वडीलाचा खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सेनगांव पोलीस ठाण्यात शनिवारी ( ता.१०) पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रूक येथील सचिन नारायण सुरनर यांने गावातील अमोल कैलास शिंदे यांच्या बहिणीस लग्नाची मागणी घातली होती. मात्र सचिन सुरनर हा व्यसनाधीन असल्यामुळे श्री. शिंदे कुटुंबीयांनी या लग्नाला नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या. सचिन सुरनर कुटुंबीयांनी कैलास माणिकराव शिंदे ( वय ४५ ) यांना गावातील हातपंपाजवळ गाठून तुम्ही आम्हाला मुलगी का दिली नाही अशी विचारणा करत श्री शिंदे यांच्या पोटात गुप्तीने वार केले यामुळे श्री शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. हे भांडण सोडविण्यासाठी श्री. शिंदे यांचे भाऊ भुजंग धोंडबाराव शिंदे मध्ये पडले असता त्यांनाही महारण करून जखमी करण्यात आले. त्यानंतर पाचही जणांनी घटनास्थळावरुन पळ काढला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सेनगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक बाबू जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

या घटनेत जखमी असलेल्या भुजंग शिंदे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी अमोल कैलास शिंदे यांच्या तक्रारीवरून सेनगांव पोलिसांनी सचिन नारायण सुरनर किरण नारायण सुरनर, नितीन विश्वनाथ कवडे, विश्वनाथ नामदेव कवडे, गणेश नामदेव  कवडे  यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक श्री. जाधव पुढील तपास करीत आहेत.

Web Title: murder in Hingoli