जालन्यात एकाचा खून; मृतदेह जाळण्याचा प्रयत्न

उमेश वाघमारे
मंगळवार, 10 एप्रिल 2018

अरुण खडके यांना चार ते पाच व्यक्तींनी मारहाणा केली. या मारहाणीत अरुण खडके यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मृतदेह अर्धवट जळाला. त्यामुळे अर्धवट जळालेल्या मृतदेहाला एका टाॅम्पोमधून घेऊन जाऊन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला.

जालना : जालना तालुक्यातील काजळा फाटा येथे एका व्यक्तीचा खून केल्याची घटना सोमवारी (ता. नऊ) रात्री उशिरा  उघडकीस  आली आहे.  अरुण खडके (रा. गांधीचमन, जालना) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी तालुका जालना पोलिसांनी चार संशयित आरोपींसह एक टाॅम्पो जप्त केला आहे. दरम्यान खूनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

या बाबात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अरुण खडके यांना चार ते पाच व्यक्तींनी मारहाणा केली. या मारहाणीत अरुण खडके यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मृतदेह अर्धवट जळाला. त्यामुळे अर्धवट जळालेल्या मृतदेहाला एका टाॅम्पोमधून घेऊन जाऊन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या प्रकरणाची माहिती मिळताच तालुका जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी भेट देऊन संशयित आरोपी बळीराम शेषराव कावळे (वय 30), कृष्णा शेषराव कावळे (वय 27), गजानन अंकुश काळे (वय 20, सर्व रा. गोलापांगरी, ता. जालना), शाम बाबुराव जोशी (वय 19, रा. संजयनगर, जालना) या चौघांना ताब्यात घेतले आहे. तर सॅम्यूअल महापूरे हा संशयित आरोपी फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान अरुण खडके यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये पाठविण्यात आला होता.

Web Title: murder in Jalna