लातुरात पुतण्याचा चुलत्याकडूनच खून

हरी तुगावकर
गुरुवार, 17 जानेवारी 2019

या प्रकारानंतर खाडगाव भाग दिवसभर बंद राहिला. दरम्यान एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणातील सातही जणांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक इंगेवाड यांनी दिली.

लातूर : जमिनीचा तसेच शेतातील सामायिक विहिरीतील पाण्याच्या वादातून पुतण्याचाच चुलत्याने व चुलत भावांनी खून केल्याची घटना येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, येथील खाडगाव भागातील जनार्दन साठे व त्यांचा भाऊ गोपाळ साठे यांच्यात जमिन व सामायिक विहिरीच्या पाण्यावर वाद होत होता. बुधवारी (ता. १६) रात्री जनार्दन साठे यांचा मुलगा आकाश साठे (वय २४) हा शेतात गेला होता. त्यावेळी वाद काढून त्याचा चुलता व चुलत भावांना त्याला काठयांनी मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला रात्री येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्याचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला.

या प्रकारानंतर खाडगाव भाग दिवसभर बंद राहिला. दरम्यान एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणातील सातही जणांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक इंगेवाड यांनी दिली.

Web Title: murder in Latur

टॅग्स