नांदेड: किरकोळ कारणावरून एकाचा निर्घृण खून 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे यांच्या पथकानी मयताची ओळख पटवून पाच तासाच्या आतच एका मारेकऱ्याला ताब्यात घेतले. ही घटना मंगळवारी (ता. १३) दुपारी उघडकीस आली होती. 

नांदेड : किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर कारागृहात असलेल्या एका अट्टल गुन्हेगाराची धमकी देणाऱ्या तरूणाचा तिघांनी निर्घृण खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह पोत्यात बांधून हस्सापूर शिवारात गोदावरी नदी पात्रात टाकला.

याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे यांच्या पथकानी मयताची ओळख पटवून पाच तासाच्या आतच एका मारेकऱ्याला ताब्यात घेतले. ही घटना मंगळवारी (ता. १३) दुपारी उघडकीस आली होती. 

शहराच्या सखोजीनगर भागात राहणारा हरमिंदरसिंग उर्फ हऱ्या देविंदरसिंग भोसीवाले (वय २४) याचा सराईत गुन्हेगार असलेल्या एकासोबत दुचाकीचा धक्का लागण्याच्या कारणावरून वाद झाला होता. यावेळी हरमिंदरसिंग हा एकटा असल्याने त्याला मारहाण करण्यात आली होती. एकट्याला मारता काय असे म्हणून कारागृहात असलेल्या एका अट्टल गुन्हेगाराची तो मारेकऱ्यांना धमकी देत होता. मित्र बाहेर येताच तुमचा काटा काढतो अशी धमकी मयत मारेकऱ्यांना देत होता. यामुळे धमकीला त्रस्त झालेल्यानी त्याच्याशी मैत्री केली. असे वाद होतच राहतात. त्यात काही वाईट वाटून घेऊ नकोस असे म्हणून ता. ११ नोव्हेंबरच्या दुपारी दोन वाजता हरमिंदरसिंग याला सोबत घेऊन हस्सापूर शिवारात असलेल्या गोदावरी पुलाखाली नेले. तेथे त्याच्यावर चाकुने सपासप वार करून त्याला ठार मारले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी पोत्यात बांधून नदी पात्रात फेकून दिले.

परंतु त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. त्याची स्थागुशाचे एपीआय विनोद दिघोरे यांनी ओळख पटविली. लगेच त्यांनी रात्रभर गस्त घालत मारेकऱ्यापर्यंत पोहचले. त्यांनी एकाला ताब्यात घेतले असून त्यांनी कबुली दिल्याचे तपासकी अधिकारी गड्डीमे यांनी सांगितले. या प्रकरणी देविसिंग भोसीवाले यांच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामिण ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: murder in nanded