जालना : गरोदर पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप

जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
Life imprisonment murdering
Life imprisonment murdering

जालना : गरोदर पत्नीचा निर्घृण खून करणाऱ्या पतीला जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.व्ही चौधरी इनामदार यांनी शुक्रवारी (ता.२५) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. चामरिया बदिया बारेला (वय २७, मूळ रा. शिवल ता.नेपानगर, जि. बऱ्हानपूर) असे या आरोपीचे नाव आहे.

जाफराबाद तालुक्यातील गारखेडा येथील मारोती संपत कळंबे यांच्या शेतात चामरिया बारेला हा पत्नीसोबत सालगडी म्हणून शेतात काम करत होता. ता. चार जानेवारी २०२१ रोजी चामरिया बारेला याने चारित्र्यावर संशय घेत गरोदर पत्नी संगीता हिला पोटावर, पाठीवर, तोंडावर व शरीराच्या इतर भागावर काठीने गंभीर मारहाण करून ठार केले.

या प्रकरणी शेतमालकाच्या फिर्यादीवरून जाफराबाद पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणी आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करत न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयामध्ये या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तपासिक अंमलदार सहायक पोलिस निरीक्षक अभिजित मोरे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.

न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पुढे आलेल्या साक्षी पुराव्यावरून आरोपी चामरिया बदिया बारेला याला जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील जयश्री सोळंके यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com