पत्नीच निघाली वैरीण

Crime
Crime

औरंगाबाद - प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढण्याचा कट पोलिस तपासात उघड झाल्याने पत्नी तथा आरोपी पत्नी पूजा सांगळे हिला बुधवारी (ता. २४) अटक करण्यात आली. लग्नापूर्वीपासून त्यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचे; तसेच तिने पतीला दिलेल्या दुधात गोळ्या टाकल्याची माहितीही समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी प्रियकर सारंग श्रीकांत (जहागीरदार) याला प्रकरणात अटक केली होती. 

सहायक प्राध्यापक असलेल्या जगदीश सांगळे व पूजाचे लग्न होण्यापूर्वी आरोपी सारंग श्रीकांत (जहागीरदार) याने सांगळे यांना ‘तू पूजाशी लग्न करू नको, ती मानसिकरीत्या स्थिर नाही; तसेच मी पूजाचा प्रियकर असल्याचे सांगत तिच्याशी लग्न केल्यास महागात पडेल, अशी धमकी दिली होती. त्यानंतर आरोपी सारंग हा सतत सांगळे व त्यांच्या वडिलांना फोन व पत्रव्यवहार करून पूजाशी लग्न करू नका, अशी धमकी देत असे. दोन जुलै २०१८ रोजी सांगळे व पूजाचा विवाह झाला, तदनंतर सारंग याने १६ ऑक्‍टोबर २०१८ रोजी घरात घुसून जगदीशला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. प्रकरणात सिडको पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. 

सोमवारपर्यंत कोठडी
पूजाला अटक करून गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता आरोपीचा मोबाईल हस्तगत करणे आहे. आरोपीकडून त्या गोळ्या जप्त करणे असल्याने पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी न्यायालयाकडे केली असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. ए. ए. खतीब यांनी पूजाला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

लग्नानंतरही करायचे फेसबुकवर चॅटिंग
पोलिस कोठडीदरम्यान आरोपी सारंगने पूजासोबत आपले वर्ष २०१० पासून प्रेमसंबंध असल्याचे सांगत लग्नानंतर तिच्याशी फेसबुकवर चॅटिंग करीत असल्याचे देखील पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दोघा आरोपींचे फेसबुक चॅटिंग केलेले सुमारे २५ मेसेज तपासले. मेसेजवरून गुन्ह्यात आरोपी पूजाचा देखील सहभाग असल्याचे उघड झाले. सारंग सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com