भावजयीचा खून, दिराला जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

औरंगाबाद : अनैतिक संबंधातून भावजयीचा खून करणाऱ्या दिराला जन्मठेप व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी बुधवारी (ता. 5) ठोठाविली. रामेश्‍वर सोनवणे (30, रा. भरतनगर) असे आरोपीचे नाव आहे. 

औरंगाबाद : अनैतिक संबंधातून भावजयीचा खून करणाऱ्या दिराला जन्मठेप व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी बुधवारी (ता. 5) ठोठाविली. रामेश्‍वर सोनवणे (30, रा. भरतनगर) असे आरोपीचे नाव आहे. 

मृत रोहिणी (मृत) हिचा विवाह शिवाजी सोनवणे यांच्याशी झाला होता. पतीचा भाऊ रामेश्‍वर कामासाठी शहरात आल्यावर त्यांच्यासोबत राहू लागला. दरम्यान, रामेश्‍वर व रोहिणी यांचे अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. याबद्दल पती शिवाजी याला संशय आला असता त्याने दोघांनाही समजावून सांगितले. मात्र, तरीदेखील त्यांनी संबंध कायम ठेवले, म्हणून रामेश्‍वरचे लग्न लावण्यात आले. लग्नाच्या दोनच दिवसांनी 14 एप्रिल 2015 रोजी रामेश्‍वरने पत्नीसह वेगळे राहण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा रोहिणीने "इथेच रहा किंवा लग्नात झालेला खर्च परत करा' असे सांगितले. त्यामुळे दोघांचे कडाक्‍याचे भांडण होऊन रामेश्‍वरने रोहिणीचा गळा आवळून खून केला. तेथून पळ काढत असताना रोहिणीच्या 12 वर्षीय मुलाने त्याला पाहिले. 

प्रकरणात ज्ञानेश्वर जाधव यांच्या फिर्यादीनुसार बेगमपुरा पोलिस ठाण्यात 16 एप्रिल 2015 रोजी गुन्हा दाखल होऊन रामेश्‍वरला अटक करण्यात आली. तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक आर. बी. रोडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. प्रकरणाच्या सुनावणीअंती न्यायालयाने रामेश्‍वरला दोषी ठरवत कलम 302 अन्वये जन्मठेप व 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठाविली. 

पत्नीचा मृतदेह रात्रभर घरात 
खून झालेल्या रात्री रोहिणीचा पती शिवाजी घरी आला असता घराला कुलूप होते. त्याने शेजारी आणि नातेवाइकांकडे विचारपूस केली असता त्यांनी दोन्ही मुले त्यांच्याकडे असून रोहिणीबाबत माहीत नसल्याचे सांगितले. त्या रात्री शिवाजी घराच्या गॅलरीतच झोपी गेले. दुसऱ्या दिवशी त्यांना शंका आल्याने घराचे कुलूप तोडल्यानंतर सदरील घटना उघडकीस आली. 

Web Title: Murder of sister in law and life imprisonment to brother in law