esakal | बापाची घेतली मदत, मामाच्या डोक्यात घातले दगड

बोलून बातमी शोधा

Osmanabad News

घरातील भांडणाच्या किरकोळ कारणावरुन भाच्याने वडिलांच्या मदतीने मामाचा खून केल्याची घटना शहरातील मुळजरोड भागातील भारत नगरमध्ये शनिवारी (ता.२२) रात्री घडली.

बापाची घेतली मदत, मामाच्या डोक्यात घातले दगड
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उमरगा (उस्मानाबाद) : घरातील भांडणाच्या किरकोळ कारणावरुन भाच्याने वडिलांच्या मदतीने मामाचा खून केल्याची घटना शहरातील मुळजरोड भागातील भारत नगरमध्ये शनिवारी (ता.२२) रात्री घडली.

याबाबतची माहिती अशी की, डौरी गोसावी समाजातील लोक भारत नगर भागात रहातात. शिवाजी हरिश्चंद्र सावंत या मजूरी करणाऱ्या व्यक्तीची एक बहिण पार्वती ही पती रामराव भानुदास साळूंके व मुलाबाळासह भारत नगर भागात रहाते.

तुम्ही एलआयसी पॉलिसी काढली असेल, तर आधी हे वाचा

शिवाजीची दुसरी बहिण सकिना यांच्या घराच्या वास्तूशांतीचा कार्यक्रम शनिवारी (ता.२२) जळकोट येथे होता. तेथे दुपारी रामराव व शिवाजीचा लहान भाऊ सखाराम सावंत यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. रात्री साठे आठच्या सुमारास शहरातील भारत नगर येथे भांडणाचे स्वरूप सुरू झाले, यात रामराव याने अर्जुन हरिश्चंद्र सावंत वय २८ याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तर जालिंदर रामराव साळूंके यांनी यांनी कपाळावर दगडाने जबर मारहाण केली.

मराठवाड्यातील हा किल्ला तुम्हाला माहित नसणारच

गंभीर जखमी अवस्थेतील अर्जुनला पहिल्यांदा खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून अर्जुनला मयत घोषित केले. या प्रकरणी शिवाजी सावंत दिलेल्या फिर्यादीनुसार भाऊ अर्जुनच्या खून प्रकरणी भाऊजी रामराव व भाच्चा जालिंदर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बाप लेकाला अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार वाघ तपास करीत आहेत.