मुलीला म्हणाला, तू थांब! नंतर कुटुंबच झाले उद्ध्वस्त

कैलास जाब्रस
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

माजलगाव तालुक्यातील घटना

माजलगाव (जि. बीड) - तालुक्यातील मोगरा लगतच असलेल्या रामनगर तांड्यावर बंडू उत्तम जाधव याने मुलीला एका ठिकाणी बसवून तू थांब म्हणत पत्नी व पोटच्या मुलांवर चाकूने वार करून त्यांना ठार केले. आज (बुधवारी) घडलेल्या या घटनेनंतर स्वतःच्या पोटात चाकू खुपसून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गावात खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील मोगरा लगत असलेल्या रामनगर तांडा येथे बंडू उत्तम जाधव (वय  45) हा कुटुंबासह शेतात आज कापूस वेचणीसाठी गेला होता. कापूस वेचणीच्या वेळी बंडूने पत्नी गंगाला (वय 40) ओढणीने गळा दाबून मारहाण केली. दरम्यान, त्यांचा आठ वर्षीय मुलगा  करण व मुलगी पूजा एका झाडाखाली बसलेले होते.

त्यानंतर बंडूने त्यांच्याकडे जात मुलगा करणला सोबत घेतले आणि परत पत्नी ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी आला. नंतर त्याने मुलाचाही ओढणीने गळा आवळला. शिवाय क्रूरपणे पत्नी आणि मुलाच्या पोटाच चाकूने वार केले. त्या नंतर स्वतःच्या पोटातही वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेत बंडूला माजलगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखलकेले. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

मुलीला म्हणला, तू थांब!
पत्नीचा गळा आवळल्यानंतर ती निपचित पडली. त्यानंतर ज्या ठिकाणी मुलगा  करण व मुलगी पूजा झाडाखाली बसलेले होते. त्या ठिकाणी बंडूने जात करणला सोबत घेतले तर मुलीला तिथेच बसण्यास सांगितले. नंतर पत्नीसोबत मुलाचीही खून केला. पण, त्याने हे कृत्य नेमके का केले, याची माहिती मिळू शकली नाही. दिंद्रुड पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

चंद्रकांत दादांच्या शुभेच्छांमुळेच आम्ही आघाडीसोबत- उद्धव ठाकरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of wife and child at beed dist