#MarathaKrantiMorcha आरक्षणाला पाठिंबा देत मुस्लिम विद्यार्थ्यांचा शिक्षणावर बहिष्कार

पांडुरंग उगले 
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

माजलगाव (जि. बीड) : मराठा आरक्षणासाठी राज्यभर सुरु असलेल्या आंदोलनाला राजेवाडी येथील मुस्लीम समाजाने पाठींबा देत मुलांच्या शिक्षणावर बहिष्कार टाकला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शिक्षणासाठी पाठविणार नसल्याचा निर्णय राजेवाडी येथील सकल मुस्लीम, मराठा समाजाने घेऊन बुधवारपासून वेगळे आंदोलन छेडले आहे.

राजेवाडी येथील पहिली ते चौथी पर्यंत असलेल्या जिल्हा परिषद शाळेत एकूण १८९ विद्यार्थी संख्या आहे. यात २५ ते ३० विद्यार्थी मुस्लीम समाजाचे, शंभरच्या आसपास मराठा समाजाचे तर उर्वरीत ईतर समाजाचे विद्यार्थी शिक्षण घेतात. मराठा आरक्षणासाठी मागील 20 दिवसांपासून राज्यभर आंदोलने सुरु आहेत. या आंदोलनाला राजेवाडी येथील सकल मुस्लीम समाजाने पाठींबा दिला असून, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत आमच्या मुलांना शाळेत पाठविणार नसल्याचा निर्णय घेत मुस्लीम समाजाच्या सर्वच पालकांनी बुधवारी (ता.आठ) शाळेच्या मुख्याध्यापकाला निवेदन देऊन मुलांची शाळा बंद केली. यात मराठा समाजानेही शिक्षणावर बहिष्कार घालत पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेत आगळेवेगळे आंदोलन सुरु केल्याने बुधवारी शाळेत जेमतेम तीस, चाळीस विद्यार्थीच उपस्थित होते.

Web Title: Muslim Community Students Left school temporary