मराठा आंदोलनाला मुस्लिम समाजाचा पाठींबा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

मंठा : मंठा येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण व इतर मागण्यासाठी शुक्रवारी (ता.20) सकाळी 11 वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर धरने आंदोलन सुरु करण्यात आले आहे. हे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरुच आहे. या धरणे आंदोलनास मुस्लिम समाजाचाही पाठिंबा मिळाला आहे. 

महाराष्ट्र शासन मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत या धरणे आंदोलनला सुरवात झाली. या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाजातील युवक शनिवारी (ता. 21) दुसऱ्या दिवशी देखील उपस्थित आहे. या आंदोलनास मुस्लिम समाजाच्या नागरीकानी एकत्रित येऊन जाहीर पाठिंबा दिला आहे. समाजाच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. असे उपस्थित आंदोलकांनी यावेळी सांगितले. यावेळी पावसाची भूरभूर सुरु झाल्याने मंडपाची व्यवस्था करण्यात आली. 
 
Web Title: Muslim community supported Maratha agitation