मराठा आरक्षणाला मुस्लिमांचा पाठिंबा

अतुल पाटील
शनिवार, 28 जुलै 2018

औरंगाबाद : लाखोंचे मोर्चे शांततेत काढून जगभरात आदर्श निर्माण करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या आरक्षण मागणीला महाराष्ट्र मुस्लिम अवामी कमिटीने शनिवारी (ता. 28) जाहीर समर्थन दिले आहे. क्रांती चौकातील ठिय्या आंदोलन आणि उपोषणस्थळी हजेरी लावत त्यांनी पाठिंब्याचे पत्र आंदोलकांना दिले आहे. 

क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी दहा दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरु आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी शिवरायांच्या पुतळ्याला सरकारला सुबुद्धी आणि समाजाला बळ देण्यासाठी 101 प्रदक्षिणा, शिवचरित्र वाचन करण्यात येत आहे. अवामी कमिटीने आता समर्थन पत्र दिले आहे. पत्रात म्हटले की, मराठा आरक्षण चळवळीला आम्ही समर्थन देत आहे.

आरक्षण मिळणे ही काळाची गरज बनली आहे. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मराठा आणि मुस्लीम समाज मागास होत आहेत. मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. मुक मोर्चात जसे सोबत होतो तसे ठोक मोर्चातही आम्ही सोबत आहे. राज्यात महाभरतीमध्ये आर्थिकरित्या मागासलेल्या मराठा समाजाला 16 टक्‍के आणि मुस्लीम समाजाला पाच टक्‍के आरक्षण मिळावे ही धारणा आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण लढत राहू. असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. पत्रावर अध्यक्ष इलियास किरमाणी यांची स्वाक्षरी आहे. 

Web Title: Muslim Community Supports Maratha Reservation