नांदेडमध्ये महामोर्चाद्वारे मुस्लिमांचा एल्गार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

नांदेड - मुस्लिम समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याची कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरू करण्यासह इतर मागण्यांसाठी नांदेडला मुस्लिम आरक्षण संघर्ष कृती समितीतर्फे आज महामूक मोर्चा काढण्यात आला. या वेळी पहिल्यांदाच महिलांचा मोठा सहभाग होता. शिस्तबद्ध व शांततेत निघालेला हा मोर्चा नांदेडच्या इतिहासातील ऐतिहासिक मोर्चा ठरला. मुस्लिम समाजाचे प्रतीक असलेला हिरवा झेंडा एकाही मोर्चेकऱ्याच्या हातात नव्हता, हे या मोर्चाचे वैशिष्ट्य होते. या मोर्चाला प्रचंड संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

नवीन मोंढा मैदानावर विविध ठिकाणांहून आलेल्या मुस्लिम बांधवांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. उघड्या जीपवर लावलेला तिरंगा झेंडा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. इतर समाजाला ज्याप्रमाणे आरक्षण दिले आहे, त्याच पद्धतीने मुस्लिम समाजालाही आरक्षण द्यावे, आम्हाला कुठल्याही समाजाचे आरक्षण हिसकावायचे नाही, तसा गैरसमजही कोणी करून घेऊ नये, भारतीय संविधानानुसार मुस्लिम समाजाला दहा टक्के आरक्षण मिळावे, हीच आमची मागणी आहे. आरक्षण मागणे म्हणजे भिक नसून, हा आमचा न्याय हक्क आहे आणि तो आम्ही मिळविणारच आहोत, अशी मते विविध वक्‍त्यांनी व्यक्त केली. मोर्चात कुणाच्याही विरोधात घोषणाबाजी झाली नाही. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे मोर्चाची सांगता झाली.

Web Title: Muslim Mahamorcha in Nanded