मुस्लिम समाजाचा बीडमध्ये ऐतिहासिक मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

मुस्लिम समाजाला आरक्षण लागू करावे, मुस्लीम पर्सनल लॉमध्ये हस्तक्षेप करु नये, समान नागरी कायदा लागू करु नये, मुस्लिम संरक्षणासाठी कडक कायद्याची तरतूद करावी, निर्दोष मुस्लीम युवकांना विना चौकशी दहशतवाद कायद्याखाली अटक करु नये, तसेच जेएनयूमधील बेपत्ता मुस्लिम युवकांचा शोध लावा, या प्रमुख मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला.

बीड : मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यांसाठी मंगळवारी (ता 20) बीडमध्ये मुस्लिम समाजाने भव्य मुकमोर्चा काढत एकीची ताकद दाखवून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. बीडच्या इतिहासात मुस्लिम समाजाचा हा गर्दीचा उच्चांक मोडणारा मोर्चा ठरला. मोर्चा शांततेत व शिस्तीत पार पडला.

मुस्लिम समाजाला आरक्षण लागू करावे, मुस्लिम पर्सनल लॉमध्ये हस्तक्षेप करु नये, समान नागरी कायदा लागू करु नये, मुस्लिम संरक्षणासाठी कडक कायद्याची तरतूद करावी, निर्दोष मुस्लिम युवकांना विना चौकशी दहशतवाद कायद्याखाली अटक करु नये, तसेच जेएनयूमधील बेपत्ता मुस्लिम युवकांचा शोध लावा, या प्रमुख मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. शहरातील श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा स्टेडीयममधून सकाळी राष्ट्रगीताने या मोर्चास सुरुवात झाली. 

सुभाष रोड, माळीवेस, टिळक रोड, बलभीम चौक, किल्ला मैदान, राजुरी वेस, बशीरगंज, शिवाजी चौक मार्गाने हा मोर्चा दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. किल्ला मैदान येथून मुस्लिम विद्यार्थी मोर्चात सहभागी झाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनास देण्यात आले.

Web Title: muslim morcha in beed