नांदेड - मुस्लिम धर्मगुरु मौलाना मोईनोद्दीन खासमी यांचे निधन

प्रमोद चौधरी
मंगळवार, 31 जुलै 2018

नांदेड : मराठवाड्यातील नामवंत इस्लामी धर्मगुरु, अखिल भारतीय
मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे विशेष निमंत्रित सदस्य, हज कमेटीचे सदस्य
तसेच इस्लामी मदसा मर्कज-उलुमचे संस्थापक मौलाना मोहमंद मोइनोद्दिन खासमी यांचे मंगळवारी (ता.३१) निधन झाले. जुन्या शहरातील नावघाट परिसरात नमाजे जनाजा अदा करून करबला स्मशानभूमीत त्यांचे दफन करण्यात आले.

चार दशकांपासून मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला अरबी
मदरसा मर्कजुल उलूमचे मौलाना खासमी संस्थापक होते. राज्यभरातील बालकांसह युवकांनी त्यांच्याकडून इस्लाम धर्माचे धडे घेतले आहेत. आज राज्यातील बहुतांश मशिदींवर त्यांचे विद्यार्थी दिक्षा प्राप्त करून इमामत करीत आहेत. अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य या नात्याने त्यांनी समाज प्रबोधनात आपले आयुष्य घातले. मुस्लिम समाजाने धार्मिक शिक्षणाबरोबरच सामान्य शिक्षणात जास्तीत जास्त प्राविण्य प्राप्त करावे, यासाठी त्यांचा संघर्ष होता. इस्लाम धर्मातील नामवंत प्रवचनकार म्हणून त्यांची ख्याती होती. आपल्या विशेष शैलीतून समाज प्रबोधन करण्यात त्यांचा हातखंडा होता. साध्या, सरळ व सोप्या भाषेत ते इस्लाम शरीयती बाबत प्रबोधन करत.

विश्व शांती व बंधू प्रेमचा संदेश त्यांनी नेहमीच आपल्या ईदच्या
बयानामधून लोकांना दिलेला आहे. मौलाना मोइनोद्दिन खासमी यांच्या निधनाने मुस्लीम समाजाची मोठी हाणी झाली आहे. सच्चा व लोकप्रिय प्रबोधनकार आम्ही गमावल्याच्या भावना शहरातील प्रमुख इमाम व जमैतुल उल्मा व मदरसांतील धर्मगुरुंनी व्यक्त केल्या.

Web Title: muslim Religious leader maulana moinoddin khasmi passed away