Video : फिटनेससाठी 25 वर्षांपासून करतोय मॉर्निंग वॉक : डॉ. शिवाजी सुक्रे

योगेश पायघन
Monday, 9 December 2019

औरंगाबाद : एमबीबीएसला प्रवेशापूर्वीपासूनच स्वतःच्या तंदुरुस्तीकडे लक्ष देतोय. एमबीबीएस, एमडी त्यानंतर विविध पदांवर काम करताना स्वतःसाठी म्हणून सकाळी तासभर वेळ काढतो. त्यामुळे दिवसभर फ्रेश अन्‌ हेल्दी फिल होते. सर्वांनीच आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी दिवसातून 40 ते 45 मिनिटे स्वतःसाठी काढली पाहिजेत, असा सल्ला घाटी रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर म्हणजे औरंगाबादकरांना नैसर्गिक देण आहे. रोज सकाळी या परिसरात गोगाबाबा टेकडी, लेणी, विद्यापीठ परिसर, सोनेरी महाल या भागात मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्यांची संख्या हजारांत आहे. दैनंदिन धावपळीत दिवसभर ज्या भेटीगाठी संवाद तुटला तो या मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून भरून निघतो.

शिवाय आरोग्याचे फायदे आहेतच. त्यासाठी उच्चपदस्थ अधिकारी, निवृत्त नोकरदार, उद्योजक, विद्यार्थी, गृहिणी मॉर्निंग वॉकला सकाळी पाचपासूनच रीघ लावतात. कोणी धावते, कोणी चालते, तर कुणी योगासने, व्यायाम करताना दिसतात. त्यांच्याशी चर्चा करून संवाद साधण्याचा प्रयत्न "सकाळ'ने केला. 

इथे - सेक्ससाठी तीन हजारांचा रेट

रोज 45 मिनिटे तरी चालायला हवे 

शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख असलेले डॉ. सुक्रे म्हणाले, ""मी गेल्या 25 वर्षांपासून रोज या परिसरात येण्याचा प्रयत्न करतो. सकाळी इथे आल्यावर दिवसभरात येणार शीण काहीसा कमी होतो. स्ट्रेसही कमी होतो. येथील वातावरण आल्हाददायी आहे. विद्यापीठ परिसर ही निसर्गाची देण औरंगाबादकरांना लाभली.

Gogababa Tekdi Aurangabad
गोगाबाबा टेकडीवर होणारी रोज गर्दी

त्याचा सहवास घेत किमान 45 मिनिटे चालले पाहिजे. स्ट्रेचेबल व्यायाम शरीरासाठी लाभदायक ठरतो. प्रत्येकाने फिटनेस जपण्यासाठी सायकलिंग, स्विमिंग, जीम असेही पर्याय निवडून फिटनेस मेंटेन केल्यास निरोगी जगता येईल. आठवड्यातून किमान पाच ते सहा दिवस तरी व्यायाम गरजेचा आहे,'' असे ते म्हणाले. आपले अनुकरण इतरही करतात. त्याचा कुटुंबीयांनाही लाभ असल्याचा अनुभव असल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MYFA : Morning Walk for Fitness : Dr Shivaji Sukre