वॉटर कप स्पर्धेत नागराळला दहा लाखांचा पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

त्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत तालुक्‍यातून नागराळ (ता. देवणी) गावास दहा लाखांचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे. तालुक्‍यातील पाणी फाउंडेशनमार्फत यावर्षी झालेल्या जलसंधारणाच्या कामातून वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली होती. यात नागराळ गावाने प्रथम क्रमांक पटकावला आहे, अंबानगर गावास द्वितीय; तर वडमुंरबी गावास तृतीय पुरस्कार देउन गौरविण्यात आले. 

देवणी(जि. लातूर) ःसत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत तालुक्‍यातून नागराळ (ता. देवणी) गावास दहा लाखांचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे. तालुक्‍यातील पाणी फाउंडेशनमार्फत यावर्षी झालेल्या जलसंधारणाच्या कामातून वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली होती. यात नागराळ गावाने प्रथम क्रमांक पटकावला आहे, अंबानगर गावास द्वितीय; तर वडमुंरबी गावास तृतीय पुरस्कार देउन गौरविण्यात आले. 

पुणे येथील कार्यक्रमात अभिनेता आमीर खान, किरण राव, सत्यजित भटकळ, भाऊ कदम यांच्या हस्ते हा पुरस्कार ग्रामस्थांच्यावतीने बस्वराज पाटील नागराळकर यांनी स्वीकारला. तालुक्‍यातील पाणी फाउंडेशनमार्फत यावर्षी झालेल्या जलसंधारणाच्या कामातून वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेले आणि लोकसहभागाचा आदर्श ठेवून, सातत्यपूर्ण मेहनत आणि जिद्दीच्या बळावर मोठ्या प्रमाणात कामे केल्याने नागराळवासीयांनी हे यश संपादन केले आहे. 

"सकाळ'चा वाटा 
नागराळ ग्रामस्थांच्या प्रयत्नाला साथ देत "सकाळ रिलीफ फंडा'तून दोन लाख रुपयांचा निधी तलावातील गाळ उपसा कामास देण्यात आला होता. यातील गाळाचा उपसा झाल्याने तलावात पाणीसाठा वाढण्यास मदत झाली आहे, तर तलावातील गाळ केवळ ट्रॅक्‍टरचा खर्च करून ग्रामस्थांनी आपल्या हलक्‍या व मध्यम स्वरूपाच्या शेतीत टाकल्याने शेतीला नवे रूपडे मिळाले आहे. ग्रामस्थांच्या साथीला "सकाळ'ने साथ दिल्याने ग्रामस्थांनी "सकाळ'चे आभार मानले. 

जलसंधारण मृदासंधारण करण्यासाठी स्पर्धा आणि वेळ महत्त्वाची नाही. त्यासाठी तालुक्‍यातील सर्वच ग्रामस्थांनी आपापल्या गावात कामांना गती देणे गरजेचे आहे. जलसंधारणाची ही मोहीम अंखडपणे सुरू ठेवल्यास तालुक्‍यातील दुष्काळ नामशेष होण्यास मदत होणार आहे. आज पश्‍चिम महाराष्ट्रात पाण्याने हाहाकार झाला आहे, तर आपल्याकडे आजही टॅंकरची वाट पाहावी लागत आहे. जलसंधारण करताना आपल्यातील स्पर्धा हेवेदावे दूर सारत अखंडता जपण्याची गरज आहे. 
- सुरेश घोळवे, तहसीलदार.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagaral gets a million prize in water cup competition