कौल कोणाला? आज कळणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

लातूर - लातूर जिल्ह्यातील निलंगा, औसा, उदगीर व अहमदपूर या चार नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी बुधवारी (ता. १४) उत्साहात शांततेत मतदान झाले. ५३९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद आले असून, त्यात चार नगराध्यक्ष पदाच्या ३८ तर १०१ नगरसेवक पदाच्या ५०१ उमेदवारांचा समावेश आहे. मतमोजणी गुरुवारी (ता. १५) होत आहे. या पालिकांचे नगराध्यक्ष कोण होणार, कोणाच्या हाती पालिका जाणार हे आज कळेल. नगराध्यक्षपदाची फेरीनिहाय मतांची माहिती दिली जाणार आहे. निकाल मात्र शेवटी जाहीर केला जाणार आहे. या चारही ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्या आहेत. त्यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अहमदपूर येथील आयटीआयमध्ये, उदगीर येथे आयटीआयमध्ये, निलंगा येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात तर औसा येथे प्रशासकीय इमारतीत संबंधित पालिकेच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी केली जाणार आहे. उदगीर येथे १४ टेबल, अहमदपूर येथे ११ टेबल, निलंगा येथे दहा टेबल व औसा येथे दहा टेबल असे एकूण ४५ टेबल मतमोजणीसाठी ठेवले जाणार आहेत. याकरिता ४५ मतमोजणी पर्यवेक्षक व ४५ मतमोजणी सहायकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

यावेळेसच्या निवडणुकीत लोकांतून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात होत असलेल्या या चार नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदासाठी ३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. चारही ठिकाणी अतिशय चुरशीच्या व बहुरंगी लढती झाल्या आहेत. विविध पक्षांच्या नेत्यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. आता मतमोजणीकडे लक्ष लागले आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरवात होणार आहे. दुपारी एक वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्‍यता आहे. मतमोजणीची निवडणूक विभागाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच मोठा पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. यात उदगीर येथे २९ पोलिस अधिकारी, ३२५ कर्मचारी, अहमदपूर येथे सहा अधिकारी, ११७ कर्मचारी, औसा येथे पाच अधिकारी, ८० कर्मचारी, तर निलंगा येथे १३ अधिकारी तर १७४ पोलिस कर्मचारी कार्यरत असणार आहेत. 

५३९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद
चार पालिकांसाठी शांततेत मतदान 
मतमोजणीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी
दुपारपर्यंत येणार निकाल हाती  
फेरीनिहाय नगराध्यक्षांच्या मतांची मिळणार माहिती
मतमोजणी केंद्रांवर तगडा बंदोबस्त

Web Title: nagarpalika election in latur