जागतिकीकरणामुळे शेती उद्ध्वस्त झाली - डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

भगवान वानखेडे
रविवार, 10 सप्टेंबर 2017

अध्यक्षीय समारोप करतांना विचारवंत डॉ. आ.ह. साळुंखे यांनी बौद्धीक आणि शारिरीक श्रमाची विभागणी करण्यात आल्यामुळेच भेदभाव निर्माण झाला आहे. मानवी शरिराची रचना मेंदू, वाणी आणि हाताने परिपुर्ण होत असते, यांच्या एकत्रिकरणातूनच नवनिर्मीती होत असते, परंतु आज तसे होत नाही मेंदू, वाणी आणि हाताची विभागणी करण्यात आली आहे. यामुळे विकास रखडला आहे. विकास करायचा असेल तर याची सांगड घालणे महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. सोबतच शुद्धतेचा आव आणणार्‍यांनी सफाई कामगारांना हिनतेची वागणूक द्यायला नको कारण ते आपल्याला स्वच्छता अप्रत्यक्षरित्या संदेश देत असतात, सोबतच या देशाला अहिंसेची मोठी देणगी मिळाली आहे ती जपली पाहीजे, फुलवली पाहीजे, हिंसा ही वाईटच असल्याचे ते म्हणाले.

जालना: जागतिकीकरणामुळे उद्योगपतींची संपत्ती वाढली आणि देशातील सुजलाम सुफलाम असलेली शेती उद्धवस्त झाली. १९९३ नंतर देशातील तीन लाख शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. त्यात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात आहेत. देशात एकीकडे काहींचे लाखोचे उत्पन्न आहे तर काहीं दिवसाला वीस रुपये कमवतात. देशात प्रचंड विषमता वाढलेली अाहे, हे स्मार्ट सिटी बनवणार्‍यांच्या लक्षात येत नसल्याची खंत डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केली. 

ते येथील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित दोन दिवस पहिल्या राज्यस्तरीय श्रमिक साहित्य संमेलनाच्या उदघटनाप्रसंगी रविवारी (ता.१०) बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  संमेलनाध्यक्ष डॉ. आ. ह. साळुंखे होते.
यावेळी स्वागताध्यक्ष साईनाथ पवार, दिनानाथ मनोहर, महाविर जोंधळे, संयोजक अण्णा सावंत यांची उपस्थिती होती. प्रारंभी उदघाटक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आले.

श्री. कोत्तापल्ले म्हणाले की,  हे साहित्य संमेलन पहिले आणि शेवटचे होणार नाही तर परिवर्तनाची सुरुवात ही सर्वप्रथम सांस्कृतिक श्रेत्रापासून होत असते. परंतु मधल्या काळात सांस्कृतिक चळवळ कोलमंडली होती, त्यामुळे विघातक वृत्तीने वर डोके काढले आहे. आता पुन्हा ही चळवळ नव्याने उभी राहत आहे.

देशात स्वतंत्र विचार करणार्‍यांची मुंडके मोडण्याची फार जुनी परंपरा आहे, सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर हितसंबध टिकून रहावे म्हणुन हे लोक असे करत असतात.  आपण आज जातीच्या आहारी ऐवढे गेलो आहोत की माणुसपण विसरुन चाललो आहोत, यामुळे मागील दोनशे वर्षांत भारतात नवीन काही निर्माण झाले नाही. जातीची भावना ऐवढी तीव्र का होत आहे याचाही विचार करणे गरजेचे आहे.  औद्योगिकीकरण होत आहे पण ते कोणाच्या मालकीचे आहे याचा विचार आपण करत नाही. जागतिकीकरणामुळे शेती उजाड बनत चालल्या आहेत, आणि आपलेच माणसे दुसर्‍यांचा खिशा भरत आहेत. जातीतच सुरक्षीतता शोधणार्‍यांना हेरुन राजकारणी स्वत:चा  फायदा करुन घेत आहेत. पण हे आपण दिसूनही निमुटपणे पाहत रहातो. उद्योगपती, राजकर्ते सोशल मीडियाचा योग्य तो वापर करतात. सांस्कृतिक चळवळीचे अंग समजणार्‍या सोशल मीडीयाचा वापर कसा करावा याचे तंत्र उद्योगपती, राजकर्ते आणि धर्मांदाना सापडले आहे. काय पसरवल्याने माथे भडकतील आणि आपला फायदा होईल याचा ते अधिक विचार करतात. पण आपण त्यात अडकत आहोत. आपण वापरले जात आहोत याची पुसटशी कल्पनाही  पल्याला नाही.

यावेळी अध्यक्षीय समारोप करतांना विचारवंत डॉ. आ.ह. साळुंखे यांनी बौद्धीक आणि शारिरीक श्रमाची विभागणी करण्यात आल्यामुळेच भेदभाव निर्माण झाला आहे. मानवी शरिराची रचना मेंदू, वाणी आणि हाताने परिपुर्ण होत असते, यांच्या एकत्रिकरणातूनच नवनिर्मीती होत असते, परंतु आज तसे होत नाही मेंदू, वाणी आणि हाताची विभागणी करण्यात आली आहे. यामुळे विकास रखडला आहे. विकास करायचा असेल तर याची सांगड घालणे महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. सोबतच शुद्धतेचा आव आणणार्‍यांनी सफाई कामगारांना हिनतेची वागणूक द्यायला नको कारण ते आपल्याला स्वच्छता अप्रत्यक्षरित्या संदेश देत असतात, सोबतच या देशाला अहिंसेची मोठी देणगी मिळाली आहे ती जपली पाहीजे, फुलवली पाहीजे, हिंसा ही वाईटच असल्याचे ते म्हणाले.

प्रारंभी अण्णा सावंत यांनी प्रास्ताविक करुन संमेलनाच्या आयोजना मागची भुमिका विषद केली. तर स्वागताध्यक्ष साईनाथ पवारांनी सिटूच्या माध्यमातून घेत असलेल्या या संमेलनातून श्रमिकांचे प्रश्‍न पुढे आले पाहिजेत, हा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले

Web Title: Nagnath Kotapalle innograted shramik sahitya sammelan esakal news