नागपूरच्या मराठा मोर्चासाठी दुचाकी फेरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 डिसेंबर 2016

लातुरात युवक, युवती व महिलांचा मोठा प्रतिसाद

लातूर : नागपूर येथे बुधवारी (ता. 14) काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चात जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा समाजातील नागरिक सहभागी होणार आहेत. या मोर्चाची जनजागृती करण्यासाठी शनिवारी (ता. दहा) शहरातून काढण्यात आलेल्या दुचाकी फेरीला मोठा प्रतिसाद मिळाला. या फेरीत युवक, युवती व महिलांचा लक्षणीय सहभाग होता.

मराठा समाजाला आरक्षण द्यावे व कोपर्डी घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, या प्रमुख मागण्यांसह स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, ऍट्रॉसिटी कायद्यात सुधारणा कराव्यात, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी आदी मागण्यांसाठी राज्यभरात जिल्हा व तालुका ठिकाणी मराठा क्रांती मूकमोर्चे निघत आहेत. या मागण्यांसाठी विशेष अधिवेशनाची मागणी करूनही मुख्यमंत्र्यांनी त्यावर काहीच ठोस निर्णय घेतला नाही. यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर बुधवारी मराठा क्रांती मूकमोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक या मोर्चात सहभागी होणार असल्याचे मोर्चा समन्वय समितीच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान या मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग वाढविण्यासाठी शनिवारी दुचाकी फेरी काढण्यात आली. एमआयडीसीतील राहिचंद्र मंगल कार्यालयापासून सकाळी फेरीला सुरवात झाली. फेरीच्या सर्वात पुढे भगवे फेटे परिधान केलेल्या युवती व महिला होत्या. त्यानंतर युवक व मराठा समाजातील नागरिक हातात भगवा ध्वज घेऊन सहभागी झाले होते. पीव्हीआर चौक, शिवाजी चौक, टिळक चौक व गांधी चौकमार्गे ही फेरी राजीव गांधी चौकात विसर्जित झाली.

Web Title: nagpur maratha morcha